रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : नशा करण्याची सवय लागल्याने ती पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने नशेची हौस पूर्ण करण्यासाठी एकाने तब्बल १२ दुचाकी चोरी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात (Sambhajinagar) उघडकीस आली आहे. या सराईत दुचाकी चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण हद्दीतून मास्टर कीचा वापर करून दुचाकी चोरी केली जात होती. यामधील काही दुचाकी ह्या बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटी रुग्णालयातून दुचाकी चोरीला (Bike Theft) गेल्या होत्या. चोरी केलेल्या दुचाकी विक्री करून यातून मिळणाऱ्या पैशातून चोरटा नशा करत होता. दुचाकी चोरीच्या घटना घडल्यानंतर याच्या तक्रारीवरून पोलिसांकडून (Police) आरोपीचा शोध सुरु केला होता. या सराईत गुन्हेगारास बेगमपुरा पोलीसांनी पकडले आहे. अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अंबर देवकर याच्याकडून विविध कंपन्यांच्या एकूण १२ दुचाक्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या. यामधील काही दुचाकी ह्या बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरून चोरी केल्याची कबुली आरोपीने यावेळी दिली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीकडून अजून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येऊ शकतात. या संदर्भातील अजून पुढील सखोल चौकशी पोलीस यंत्रणा करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.