Nilesh Lanke: सुजय विखेंना माफी मागण्याची वेळ का आली? नीलेश लंकेंनी कारण सांगितलं आणि खोचक टीकाही केली

Sujay Vikhe vs Nilesh Lanke: आमदार नीलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखेंच्या या माफीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sujay Vikhe vs Nilesh Lanke
Sujay Vikhe vs Nilesh LankeSaam TV
Published On

Nilesh Lanke vs Sujay Vikhe Latest News

भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी (ता. १८) पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर जाहीर माफीनामा सादर केला. यंदा निवडणुकीचा तिकीट मला जरी मिळालं असलं, तरी गेला ५ वर्षाचा काळ हा खडतर काळ होता, या काळात कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो, असं सुजय विखेंनी म्हटलं. त्यांच्या या माफीनाम्यामुळे सर्वच अवाक् झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sujay Vikhe vs Nilesh Lanke
Santosh Bangar: उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना देऊन बाळासाहेबांनी महापाप केलंय; आमदार संतोष बांगर यांचं विधान

अशातच राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विखेंच्या या माफीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ येत आहे. याचा अर्थ तुमचा राजकीय स्वार्थ भागला आहे. आता परत तुम्ही आहे त्या स्थितीत कार्यकर्त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणार आहात", अशी टीका नीलेश लंके यांनी केली आहे.

"माझे सुज्ञ नागरिकांना सांगणे आहे की, ही माफी फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असून आपला स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बदला घेतल्याशिवाय सोडत नसतात. हा प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण असतो. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, असेही निलेश लंके म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

नुकतीच भाजपने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. निवडणुकीचे तिकीट मिळताच खासदार विखे यंत्रणा कामाला लागली आहे.

मात्र, नगर दक्षिणमध्ये भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. संघटनेत जुन्यांविरोधात नवा, तर भाजप निष्ठावान विरुद्ध विखे यंत्रणा असा वाद सुरू आहे. त्यातच सुजय विखे यांच्याविरोधात नीलेश लंके मैदानात उतरण्याची शक्यता आहे. नीलेश लंके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आणि सुजय विखेंविरोधात निवडणूक लढवणार, अशा चर्चा अहमदनगरमध्ये सुरू आहे.

मात्र, नीलेश लंके यांनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यावरअद्यापही भाष्य केलेलं नाही. असं असलं तरी, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जर सुजय विखे यांच्याविरोधात नीलेश लंके निवडणुकीच्या रिंगण्यात उतरले, तर अहमदनगर लोकसभेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

Sujay Vikhe vs Nilesh Lanke
Maharashtra Politics: दोन बडे नेते ठाकरेंची साथ सोडणार? शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा; नावेही सांगितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com