उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) इंडिया आघाडी सध्या आघाडी आहे (India Aghadi) तर भाजपला (BJP) पिछाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी इंडिया आघाडी ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप फक्त ३५ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे पिछाडीवर होते. पण आता ते आघाडीवर आले आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून नरेंद्र मोदी जवळपास ५ हजार मतांनी पिछाडीवर होते पण आता ते आघाडीवर आले आहेत. तर अमेठीमधून केंद्रीय मंत्री इराणी या देखील पिछाडीवर आहेत. तर रायबरेलीमधून राहुल गांधी हे आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. इंडिया आघाडी ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ३५ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीएचे मोठे नुकसान होताना दिसत असून इंडिया आघाडीला फायदा होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वांधिक जागांवर समाजवादी पार्टी पक्ष आघाडीवर आहे. पूर्वांचलमधील अनेक जागांवर समाजवादी पक्ष पुढे आहे. सपा जवळपास ३२ जागांवर पुढे आहे. त्यामुळे मोठ्या आघाडीच्या वाटेवर असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत एनडीएने उत्तर प्रदेशमधून एकूण ६४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये सपा-बसपा आघाडीला १५ जागा मिळाल्या आणि एक जागा काँग्रेसला मिळाली होती. सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक जिंकली होती. तर काँग्रेसचे राहुल गांधी अमेठीतून निवडणूक हारले होते. समाजवादी पक्षाला पाच जागा जिंकण्यात यश मिळाले होते.
पण, यावेळी सपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एकत्र निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सरकार विरुद्ध इंडिया आघाडीमुळे अनेक जागांवर काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तसेच बसपा प्रमुख निवडणूक प्रचारापासून दूर राहिल्याने त्यांच्या मतदारांमध्ये संभ्रमावस्था राहिली आणि बसपाची बहुतांश मते त्यांच्या हातून गेली असल्याचे मानले जात आहे. बसपाचे मूळ मत सपा आणि भाजपकडे गेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.