uttam jankar meets devendra fadnavis madha lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha Election 2024 :'माढा'त ट्विस्ट, धैर्यशील माेहिते पाटील गटाच्या गळाला लागण्यापूर्वी भाजप नेत्याची फडणवीसांकडून मनधरणी

Madha Lok Sabha Election : माढामध्ये जानकारांनी मोहिते पाटील यांना माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकरांना मदत करावी असा प्रस्ताव माहिते पाटील गटाला गेल्याचे समजते.

भारत नागणे

Madha Lok Sabha Constituency :

माढा लाेकसभा मतदारसंघात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी नाराजीतून हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या माळशिरसचे भाजपचे नेते उत्तम जानकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नाराजी दूर झाल्याचे समजते. या भेटीने माेहिते पाटील गटाला मात्र धक्का असल्याची चर्चा सुरु आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते धैर्यशील माेहिते पाटील यांनी गावा गावात जाऊन जनतेची गाठभेट घेत आहेत. गाव भेटी दौऱ्यादरम्यान माेहिते पाटील हे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मतं जाणून घेत आहेत.

दूसरीकडे राजकीय वैर विसरून धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र येण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून माढात वर्तवली जात आहे. माढा मध्ये जानकारांनी मोहिते पाटील यांना माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकरांना मदत करावी असा प्रस्ताव माहिते पाटील गटाला गेल्याचे समजते. त्यावर चर्चा देखील झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या 40 वर्षांपासून जानकर - मोहिते पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. माढ्यातून धैर्यशील पाटील हे निवडणूक लढविण्यावर आजही ठाम आहेत. त्यामुळे जानकर - मोहिते पाटील गट एकत्रित आल्यास त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात हाेती.

माळशिरसचे नेते उत्तम जानकर हे माेहिते पाटील गटाच्या गळाला लागण्यापूर्वीच त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली गेली. यावेळी भाजपचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे दाेघेही उपस्थितीत हाेते.

दरम्यान जानकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांना स्पष्ट केल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT