Union Ministers Ashwini Choubey Saam Tv
लोकसभा २०२४

Bihar Lok Sabha: केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, अजय निषाद यांचं तिकीट कापलं; बिहारमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर

Satish Kengar

Bihar Lok Sabha:

भाजपने रविवारी बिहारमधील सर्व 17 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यादीत चार नवीन चेहरे आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या जागी पक्षाने माजी आमदार मिथिलेश तिवारी यांना बक्सरमधून उमेदवारी दिली आहे. मुझफ्फरपूरमधून अजय निषाद यांच्या जागी राजभूषण निषाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सासाराममधून छेदी पासवान यांच्या जागी शिवेश राम आणि नवादामधून राज्यसभा खासदार विवेक ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारांमध्ये एकाही महिलेला उमेदवारी देण्यात आलेली नाही. सध्याच्या खासदारांमध्ये रमा देवी या शिवहरमधून पक्षाच्या एकमेव महिला खासदार होत्या. शिवहरची जागा युतीत जेडीयूच्या खात्यात गेल्याने रमा देवी यांचा पत्ता कट झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गिरीराज सिंह यांना पुन्हा संधी

पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी जारी केलेल्या यादीनुसार पश्चिम चंपारणमधून डॉ.संजय जैस्वाल, पूर्व चंपारणमधून राधामोहन सिंग, मधुबनीमधून अशोक कुमार यादव, अररियामधून प्रदीप कुमार सिंह, दरभंगामधून गोपाल ठाकूर, मुझफ्फरपूरमधून राजभूषण निषाद, महाराजगंजमधून जनार्दन सिंग सिग्रीवाल, सारणमधून राजीव प्रताप रुडी, उजियारपूरमधून नित्यानंद राय, बेगुसरायमधून गिरीराज सिंह, पटना साहिबमधून रविशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून रामकृपाल यादव, आरराहमधून आरके सिंह, बक्सरमधून मिथिलेश तिवारी, सासाराममधून शिवेश राम, ए. सुशील कुमार सिंह आणि विवेक ठाकूर यांना नवादामधून उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

लोकसभेची जागा आणि उमेदवारांची नावे

पश्चिम चंपारण - संजय जयस्वाल

पूर्व चंपारण - राधामोहन सिंग

अररिया - प्रदीपकुमार सिंग

औरंगाबाद - सुशीलकुमार सिंग

मधुबनी - अशोक कुमार यादव

दरभंगा - गोपाल जी ठाकूर

मुझफ्फरपूर - राजभूषण निषाद

महाराजगंज - जनार्दन सिंग सिग्रीवाल

सरन - राजीव प्रताप रुडी

उजियारपूर - नित्यानंद राय

बेगुसराय - गिरीराज सिंह

नवाडा - विवेक ठाकूर

पटना साहिब - रविशंकर प्रसाद

पाटलीपुत्र - रामकृपाल यादव

आरा - राजकुमार सिंग

बक्सर - मिथिलेश तिवारी

सासाराम - शिवेश राम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने; होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT