Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: 'तुम्हाला शाहांनी मातोश्रीबाहेर बसवलं होतं', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: 'तुम्हाला शाहांनी मातोश्रीबाहेर बसवलं होतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis:

'तुम्हाला शाहांनी मातोश्रीबाहेर बसवलं होतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा उलेख करत मानले आहेत की, ''अडीच अडीच वर्षाचं ठरलं होतं. मात्रोश्रीत शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे. त्या खोलीत अमित शाह आणि मी, दोघांनी बसून ठरवलं होतं. अमित शाह आले होते, त्यांना मी सांगितलं होतं, अडीच अडीच वर्षाचं (मुख्यमंत्रीपद), तेव्हा ते, ठीक आहे म्हणाले होते. त्याला तुम्ही (देवेंद्र फडणवीस) कुठलीतरी खोली म्हणता.''

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, ''कधी न दिसणार आता महाराष्ट्रात दिसायला लागले आहेत. मोदी येत आहेत अमित शाह येत आहेत. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून अपार कष्ट घेतले आणि आता बोलत आहेत खोटी शिवसेना आहे. देवांची शपथ घेऊन मी बोलतो, अमित शाह आले होते, त्यांना बोलो होतो अडीच अडीच वर्ष तेव्हा ते हो बोले होते.''

उद्धव ठाकरे म्हणाले, ''देवेंद्र फडणवीस बोलले होते की, आपण अडीज वर्षाने आदित्यला मुख्यमंत्री करू. मी अडीज वर्षाने लोकसभेत जाणार आहे. त्यांना वरती अर्थमंत्री व्हायचं होतं. हे लोक बोलले आम्ही भ्रमिष्ट आहोत. मला बोलतात की मागच्या वेळी अमित शाह आले तेव्हा कुठली तरी खोली बोलले. पण ते खोली मंदिर आहे.''

महायुतीच्या नेत्यांना उद्देशून ठाकरे म्हणाले, ''तुम्हाला आता फिरता येत नाही. गावबंदी केली आहे. हे लोक खोटी आश्वासन देत आहेत.'' ते म्हणाले, ते सगळे उद्योग आणि धंदे गुजरातला घेऊन गेले. मोदी महाराष्ट्रामधील लोकांच्या तोंडातील घास हिसकावत आहेत. अनेक ठिकाणी गो बॅक मोदीचे नारे लगावले जात आहेत.''

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''2012 सालापासून आपण मुंबई महापालिकाला वर आणलं आहे. अनेक पैसे लुबाडायचे काम महापालिकामध्ये काढले जात आहेत. मुंबई शाह-मोदी यांना विकेलली महापालिका होणार आहे. मुंबईच महत्त्व या लोकांना संपवायचं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कंत्राटी आरोग्य कर्मचारी पंधरा दिवसापासून बेमुदत संपावर

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Ambajogai News : अंबाजोगाईच्या तरुणाने बनवली 'सायबर बंधू' वेबसाइट; गैरवापराला बसणार आळा

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

Mukesh Ambani : अंबानींच्या घरी रोज बनवल्या जातात तब्बल ४००० चपात्या! वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT