Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक? ठाकरेंसाठी राऊतांचा पंतप्रधानपदावर दावा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं सुप वाजलं नाही तोच आता ठाकरे गटाला पंतप्रधानपदाचे वेध लागलेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान का असू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित केलाय.
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक? ठाकरेंसाठी राऊतांचा पंतप्रधानपदावर दावा
Uddhav ThackeraySaam Tv

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीचं सुप वाजलं नाही तोच आता ठाकरे गटाला पंतप्रधानपदाचे वेध लागलेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान का असू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंसाठी पंतप्रधानपदावर दावा केल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधलाय. तर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आमच्याकडे अनेक अनुभवी चेहरे असल्याचं म्हटलंय. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आणि मविआच्या उमेदवाराला मत म्हणजे राहुल गांधीना मत, असा प्रचार भाजपकडून केला जातोय.

उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक? ठाकरेंसाठी राऊतांचा पंतप्रधानपदावर दावा
Maharashtra Politics: 'बहिणीचे जे हाल झाले, तेच भावाचे होणार', अंबादास दानवे यांचा महादेव जानकर यांना खोचक टोला

उद्धव ठाकरे पंतप्रधान?

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा अधिकृत उमेदवार अजुनही जाहीर करण्यात आलेला नाही. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल 2019 च्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सहभागी होते. मात्र महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर उद्धव ठाकरे मोदींच्या विरोधात एक प्रखर चेहरा म्हणून समोर आलेत. शिवाय बाबरी मशिद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका सर्वश्रृत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या हिंदुत्त्ववादी प्रचाराविरोधात उद्धव ठाकरे चांगला पर्याय ठरू शकतात.

मात्र राजकारण फक्त शक्यतांवर चालत नाही हेही तितकच खरं आहे. 2014 आणि 2019च्या निवडणुकांच्या तुलनेत मोदींची लाट काहीशी ओसरलेली असली तरीही नजिकच्या काळातील इंडिया आघाडीचे मतभेद पाहता मोदींचं पारडं जड आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक? ठाकरेंसाठी राऊतांचा पंतप्रधानपदावर दावा
Maharashtra Water Crisis: नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त, जनता हंडाभर पाण्यासाठी त्रस्त; ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई

दरम्यान, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतून मोदींविरोधात आपली उमेदवारी सादर केलीय. इंडिया आघाडीत आपली डाळ शिजणार नाही म्हणून नितिश कुमारांनी पुन्हा भाजपकडे धाव घेतली. जागावाटपावरून नाराज झालेल्या ममता बॅनर्जींनी अजून इंडिया आघाडीबद्दल आपलं मत स्पष्ट केलेलं नाही. तर दारू घोटाळ्यात जेलमध्ये अडकलेले अरविंद केजरीवाल सध्या तरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर आहेत. आता राऊत म्हणतात तसं उद्धव ठाकरे पुढाकार घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com