Satara Final Result Saam TV
लोकसभा २०२४

Satara Final Result: साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा दणदणीत विजय

Satara Loksabha Constituency Result Udayanraje Bhosle Vs Shashikant Shinde: भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामधील लढत राज्यात चर्चेत आली होती. या हायहोल्टेज लढतीचा अंतिम निकाल समोर आला आहे.

Gangappa Pujari

सातारा, ता. ४ जून २०२४

देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. नुकताच सातारा लोकसभा मतदार संघातील लढतीचा निकाल समोर आला असून भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

साताऱ्याचा खासदार ठरला!

सातारा लोकसभा मतदार संघांसाठी भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सामना झाला. उदयनराजे भोसले गत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार की शशिकांत शिंदे जोर का झटका देणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर साताऱ्याचा खासदार निश्चित झाला असून उदयनराजे भोसले यांनी मुसंडी मारत दिल्लीचे तिकीट मिळवले आहे.

उदयनराजेंविरुद्ध शशिकांत शिंदेंमध्ये लढत!

तत्पुर्वी सातारा लोकसभेसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरुन बराच संभ्रम निर्माण झाला होता. भाजपकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र पक्षाकडून ताटकळत ठेवल्याने राजेंना दिल्लीत मुक्काम ठोकावा लागला होता. दुसरीकडे मावळते खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने शरद पवार यांच्यापुढेही उमेदवार देण्याचे आव्हान होते.

अगदी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतर भाजपनेही उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीची घोषणा केली. तिकीट वाटपापासून ते प्रचाराच्या धडाक्यांनी गाजलेल्या या हायहोल्टेज लढतीत अखेर उदयनराजे भोसलेयांनी बाजी मारत साताऱ्याचा गड राखण्याचा पराक्रम केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT