Supriya sule saam tv
लोकसभा २०२४

Supriya Sule: आजचा काळ संघर्षाचा, इंग्रज आल्यासारखे लढाई सुरू आहे; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

Supriya Sule On BJP: आज संघर्षाचा काळ आहे. इंग्रज आल्यासारखे लढाई सुरू आहे. महाराष्ट्रात लोक त्यांना मत देणार नाही, हे भाजपला माहीत आहे, असं म्हणत शरद पवार गटाच्या बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Supriya Sule On BJP:

>> दिलीप कांबळे

आज संघर्षाचा काळ आहे. इंग्रज आल्यासारखे लढाई सुरू आहे. महाराष्ट्रात लोक त्यांना मत देणार नाही, हे भाजपला माहीत आहे, असं म्हणत शरद पवार गटाच्या बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. मुळशी येथे प्रचार सभेला संबोधित करताना त्या असं म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''बाळासाहेब आणि पवार साहेब यांनी एकमेकांवर प्रचंड टीका केल्या. परंतु त्यांनी वैयक्तिक नातं टिकवलं. ही लढाई महाराष्ट्रच्या विरोधात असणाऱ्या दिल्लीच्या तख्ताची आहे. अनेकनावर दडपशाही केली जात आहे. अनेकांचे फोन येतात. पण त्यांना सांगते 7 मे पर्यंत जे करायचं आहे ते करा, 8 मे रोजी मला येऊन भेटा.''

त्या म्हणाल्या, ''शिवसेना पक्ष हा फक्त बाळासाहेब यांचाच आहे. शिवसेना ही एकच आहे. त्यामुळे बाकी शिंदे आहेत का, कोण मला माहित नाही. कारण मी त्यांना पक्ष मानत नाही. राज्यातील लाडका मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे आहे. हा सर्व्हे आहे.''

सुळे पुढे म्हणाल्या की, ''काँग्रेस आणि शिवसेना यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. ईडी बाजूला ठेवून लढले, तर नेमकं काय ते समजेल.'' त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा काम भाजपने केलं. देशाच्या कृषी मंत्रींचे नाव कोणालाच माहीत नाही.''

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार फेल, रोजगारीत फेल, महागाई कमी करण्यात फेल, सगळ्यात हे सरकार फेल आहे. हिंजवडीमधील 50 हजार नोकऱ्या कमी झाल्या. 1 कोटी नोकऱ्या देणार होते. ''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मोदींच्या प्रचाराचा नारळ धुळ्यात का फुटला? फडणवीसांनी सांगितलं कारण | Marathi News

Winter Season: हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

Maharashtra News Live Updates: गद्दार न केलेल्या कामाचा गवगवा करतात - उद्धव ठाकरे

Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

Maharashtra Election : विरारमध्ये पैशांचा पाऊस; काल ७ कोटी आज २ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT