tanaji sawat criticises omraje nimbalkar on terna sugar factory issue dharashiv lok sabha election  Saam Digital
लोकसभा २०२४

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: तेरणा कारखान्यातील भंगारावरुन तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा, व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल

Dharashiv Latest Marathi News : गेल्या काही दिवसात आरोग्यमंञी तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv Lok Sabha Election :

उध्दव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या सभेपूर्वीच आरोग्यमंञी तानाजी सावंत यांनी कार्टूनच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल केला आहे. तेरणा कारखान्यातील भंगार चोर असे कार्टूनवर उल्लेख करत सावंतांनी ओमराजेंना डिवचलं आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

धाराशिव मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप प्रत्यारोपाने मतदारसंघाचे वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसात आरोग्यमंञी तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

ओमराजे यांच्या प्रचारार्थ उद्या धाराशिव मध्ये उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच तानाजी सावंत यांनी ओमराजेंना टिकेचे लक्ष केले आहे. तेरणा कारखान्यातील भंगार चोर असा उल्लेख करत कार्टूनच्या माध्यमातून सावंतांनी ओमराजेंवर निशाणा साधला आहे.

समाज माध्यमातून हे कार्टून ओमराजेंवरील टीका व्हायरल केली गेली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या सभेआधीच वातावरण तापल्याचे चित्र आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT