sveep awareness program held in kolhapur on eve of lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

Sveep Awareness Program In Kolhapur : काेल्हापुरात 10 हजार 495 विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, नॅशनल रेकॉर्डसह एशिया पॅसिफीक रेकॉर्डची नोंद (video)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

लोकसभा निवडणूक 2024 (lok sabha election 2024) अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियाना मधील स्वीप अंतर्गत (Sveep Awareness Program) कोल्हापूरात आज (मंगळवार) 10 हजार 495 विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारली. यामधून विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला. (Maharashtra News)

हा उपक्रम कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर झाला. यावेळी शहरातील 38 हून अधिक शाळांमधील 10 हजार 495 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मोलाची भर घातली.

ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद झाली. यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, देशस्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

या उपक्रमाला मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरीक्त मनपा आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम, सहायक नोडल वर्षा परिट, श्री.धायगुडे उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT