Sushma Andhare Saam Digital
लोकसभा २०२४

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Sushma Andhare On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या या लावरे त्या व्हिडिओवर सुषमा अंधारेंनी अतिशय तिखट प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना चांगलंच सुनावलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे दाखले देणे तुम्हाला शोभत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

Sandeep Gawade

ठाण्यातील नरेश मस्के यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी सुषमा अंधारेंचा व्हिडिओ चालवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. २७ वर्षांपूर्वीच्या या व्हिडिओत सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या या लावरे त्या व्हिडिओवर सुषमा अंधारेंनी अतिशय तिखट प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना चांगलंच सुनावलं आहे. बाळासाहेब आणि मी कधीही शब्द बदलत नाही, 27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही, तो व्हिडिओ दाखवून फार मोठा तीर मारला असं समजू नका. बाळासाहेब ठाकरे यांचे दाखले देणं तुम्हाला शोभत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

तुमच्या आणि माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आला आहात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित अजित या सगळ्यांनी मिळून माझी सुपारी तुम्हाला दिली असल्याचा गंभीर आरोप करत तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

माझ्यात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणत होते की, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा सुटली की सुटली, शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली? 27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं समजू नका. रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे उसने म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुमच्यावर केलेली खालच्या पातळीवरील टीका हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ? अशा सवालही त्यांनी केला आहे.

पण माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा तुमच्यासारख्या लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा. असं त्यांनी म्हटलं आहे. आज ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश मस्के यांची प्रचारसभा झाली. या सभेत सुषमा अंधारेंचा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतानाचा व्हिडिओ लावला होता.उद्धव ठाकरे वडील चोरल्याची भाषा करतात मग अशा लोकांना सोबत ठेवताना वडिलांची आठवण येत नाही का? असा सवाल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

SCROLL FOR NEXT