सूरत, गुजरात
गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीचा मुद्दा सध्या गाजतोय. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंतर इतर आठ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे दलाल यांची बिनविरोध निवड झाली. मतदान प्रक्रियेआधीच सूरतमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष अॅक्टिव्ह मोडमध्ये आलाय. आता त्यांनी थेट निवडणूक आयोगात तक्रार केली असून, निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याची मागणी केली आहे.
भाजप उमेदवार (BJP Candidate) मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्यासह पर्यायी उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरला. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर आरोप केले आहेत. अनुचित प्रभावामुळं दलाल यांना विजयी घोषित केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. सूरत लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या जागेवर नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेत्यांच्या (Congress leaders) शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्यात यावी, अशी मागणीही केली. काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर सांगितले की, 'सूरतची निवडणूक स्थगित करण्यात यावी आणि पुन्हा निवडणूक प्रक्रिया घ्यावी. चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकून लाभ घेतला जाऊ शकत नाही असा स्पष्ट संदेश यातून जाईल, अशी आग्रही मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सूरतमध्ये चार अनुमोदकांनी काँग्रेस उमेदवाराला (Congress candidate) अनुमोदन दिले होते. मात्र, अचानक चौघांनीही सह्या न केल्याचे सांगितले. चौघांनी एकाच वेळी असं म्हणणं हा योगायोग नाही. आमचा उमेदवारही बराच वेळ समोर आला नव्हता. अन्य सर्व उमेदवारांनीही माघार घेतली. आमच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. सूरतची जागा आयती दिली जावी असे वाटत असेल तर, निवडणूक घेण्याची आवश्यकता काय आहे? असा सवालही त्यांनी केला.
सूरतमधून भाजप उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. त्यांच्या अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचं कारण देण्यात आलं. काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर उर्वरित उमेदवारांनीही माघार घेतली. त्यामुळे दलाल हे बिनविरोध निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पहिलेच उमेदवार म्हणून मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.