Raosaheb Danve Vs Kalyan Kale  Saam Tv
लोकसभा २०२४

Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

साम टिव्ही ब्युरो

Raosaheb Danve Vs Kalyan Kale:

मराठवाड्यातील महत्वाच्या महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला जालना मतदारसंघ आहे. कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. मोसंबी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जालन्याला मोसंबीचं हब म्हणूनही ओळखलं जातं. तर स्टील उत्पादनातही जालना आघाडीवर आहे. महत्वाच्या असलेल्या या मतदारसंघावर 1999 पासून भाजपची सत्ता आहे.

महत्वाचं म्हणजे 1999 पासून रावसाहेब दानवेच या मतदारसंघाचे खासदार आहेत. पाच टर्म खासदार राहिलेल्या दानवे यांना भाजपने सहाव्यांदा मैदानात उतरवलंय. तर दानवेंना यंदा काँग्रेसच्या कल्याण काळे यांचं मोठं आव्हान असणार आहे. डॉ. कल्याण काळे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. तर वंचितकडून प्रभाकर बकले हे जालन्याच्या रिगणात उतरलेत. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालन्याच्या रिंगणान उतरलेले डॉ कल्याण काळे कोण आहेत? हे जाणून घेऊ...

कोण आहेत डॉ. कल्याण काळे?

कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 मध्ये विधानसभेला हरिभाऊ बागडेंचा त्यांनी पराभव केला. ते काँग्रेसचे निष्ठानंत कार्यकर्ते आहेत. दरम्यान, जालना हा भाजपचा बालेकिल्ली आहे. तिथे भाजपला हरवणं महाकठिण काम आहे. यातच 2019 च्या मतांची आकडेवारी जाणून घेऊ..

मतांची आकडेवारी - 2019

  • रावसाहेब दानवे - भाजप - 6 लाख 98 हजार 19

  • विलास औताडे - काँग्रेस - 3 लाख 65 हजार 204

  • डॉ. शरदचंद्र वानखेडे - वंचित - 77 हजार 198

भाजपचे रावसाहेब दानवे 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजयी झालेत. दानवेंचा हा विजय पाहिला तर या मतदारसंघात भाजपची ताकद किती आहे याचा अंदाज आपल्याला येईल.

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न

  • सीसीआय मार्फत कापूस खरेदी नाममात्र, त्यामुळे कापूस घरात पडून

  • 15 दिवसांनी शहराला पाणीपुरवठा

  • विद्यापीठाच्या उपकेंद्राची पाच वर्षांपूर्वी फक्त घोषणा

  • मेडिकल कॉलेजला मंजुरी मात्र इमारती अभावी रुग्णालयावर ताण

  • सोलापूर -जळगाव रेल्वेमार्गाचा फक्त सर्व्हे, काम सुरू नाही

  • सिंचनासाठी मोठा प्रकल्प नाही

  • संभाजीनगर - परभणी - नांदेड रेल्वे लाईनचा दुहेरीकरण प्रश्न प्रलंबित

एकंदरितच जालना मतदारसंघात भाजपचं पारडं जड वाटत असलं तरी डॉ कल्याण काळे यांनी दानवेंसमोर आव्हान उभं केलंय.. त्यामुळे दानवे खासदारकीचा षटकार मारणार की त्यांचा विजयी रथ कल्याण काळे रोखणार हेही पाहणं महत्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT