Ravindra Waikar Saam Digital
लोकसभा २०२४

Ravindra Waikar: जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं पक्षांतर केलं, रवींद्र वायकरांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: राज्याचे माजी मंत्री आणि नुकतेच शिंदे गटात आलेले उत्तर-पश्चिम मुंबईचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांनी धक्कादायक गौप्यस्फोट केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Ravindra Waikar News:

राज्याचे माजी मंत्री आणि नुकतेच शिंदे गटात आलेले उत्तर-पश्चिम मुंबईचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांनी धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट सरकारी यंत्रणांचा दबाव असल्यानेच पक्षांतर केल्याचं खळबळजनक विधान केलंय. वायकर हे शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यांची लढत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी आहे. दोन्ही शिवसैनिक आमनेसामने असल्याने या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलंय त्यात वायकरांच्या वक्तव्याने महायुती चांगलीच तोंडघशी पडलीय.

रवींद्र वायकर म्हणाले आहेत की, मी जड अंत:करणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता. या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्याने मी व्यथित झालो होतो. नियतीने अशी वेळ कुणावरही आणू नये.

एकीकडे विरोधक सातत्यानं भाजपवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतात. वायकर ठाकरे गटात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणात आरोप केले होते. या प्रकरणात वायकरांची ईडी चौकशी सुरू आहे. जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आला होता. आता त्यांना लोकसभेचं तिकिट मिळालं आहे. तर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटलांनीही यापूर्वी भाजपत आल्यामुळे शांत झोप लागते, असं वक्तव्य जाहिर सभेत केलं होतं. आता रविंद्र वायकरांच्या या गौप्यस्फोटामुळे विरोधकांच्या हातात आयत कोलीत मिळालंय.

आता या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्यामुळे वायकरांनी आता सारवासारव करत या सर्व प्रकरणाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलंय. ठाकरे पाठीशी उभे न राहिल्यामुळे पक्षांतराची वेळ आल्याचा दावा त्यांनी केलाय.

सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधकांना दावणीला बांधत असल्याचा आरोप सातत्यानं होतोय. याची यापूर्वी पक्षांतर केलेल्या नेत्यांनी कधी दबक्या आवाजात तर कधी खुलेपणानं कबुली दिलीय. आता ऐन निवडणुकीत वायकरांनीही अशी कबुली दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची नको ती डोकेदुखी वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT