Sandipan Bhumre Against Chandrakant Khaire Saam Tv
लोकसभा २०२४

Sambhajinagar Lok Sabha: संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांची होणार लढत, चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी

Sandipanrao Bhumre: एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency:

>> सुरज मसुरकर

एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भूमरे यांना शिंदे गटाने रिंगणात उतरवलं आहे. येथून आधीच ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध भुमरे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या एकदिवस आधीच म्हणजे शुक्रवारी 'साम टीव्ही' याबाबत बातमी दिली होती. ज्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यातच शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट दोन शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. मात्र ही जागा अखेर शिंदे गटाच्या पारड्यात पडली असून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी संदीपान भुमरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील बडे नेते उपस्थित राहू शकतात. यावेळी मोठं शक्तिप्रदर्शनही शिंदे गटाकडून केलं जाऊ शकतं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे येथील विद्यमान खासदार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. या निवडणुकीत एमआयएमनेही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे येथे यंदा तिहेरी लढत पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट? डीए वाढीबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT