shiv sena mp sanjay mandlik criticised sharad pawar on shahu maharaj candiate in kolhapur lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024 : शरद पवारांना जुना राग काढायचा असेल, शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे षडयंत्र : संजय मंडलिक

kolhapur lok sabha constituency : सतेज पाटील माझे चांगले मित्र आहेत. ते पुन्हा माझ्या स्टेजवर येतील. व्यक्तिगत हेवा दाव्यातून लोकसभेच्या निवडणूक होऊ नये असे संजय मंडलिक यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Sanjay Mandlik Latest Marathi News :

शरद पवार (sharad pawar) हे मोठे नाते आहेत. शाहू महाराज यांना निवडणुकीत उभे करण्याचे (shahu maharaj to contest election from kolhapur lok sabha constituency) शरद पवार यांचे षडयंत्र आहे. शरद पवार यांना जुना राग काढायचा असेल आणि जनता सुद्धा आता याला तयार आहे अशी टिप्पणी शिवसेना खासदार संजय मंडिलक (shivsena mp sanjay mandlik) यांनी केली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. 15 मार्च) मेळावा घेत उमेदवारी असाे अथवा नसाे आपण निवणुक लढवाच असा स्वबळाचा नारा दिला.

दरम्यान आज साम टीव्हीशी बाेलताना खासदार संजय मंडलिक यांनी माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल असे स्पष्ट केले. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मला खासदार श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांचा फोन आला हाेता. मला अस्वस्थ आहात का असे त्यांनी विचारले. उमेदवारी जाहीर होईल असा शब्द त्यांनीही मला दिला आहे.

दरम्यान उमेदवारी घोषित नसल्याने मी मेळाव्याला उपस्थित नव्हतो. मी उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर महायुतीच्या सगळ्या पक्षांचा मेळावा घेणार असल्याचेही खासदार मंडलिक यांनी नमूद केले. ते म्हणाले मी मुंबईत चंद्रकांतदादा पाटील (chandrakant patil) ,हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांची भेट घेतली. समरजितसिंह घाटगे (samarjeet singh ghatge) यांचीही भेट होत असते. खासदार धनंजय महाडिक (mp dhananjay mahadik) यांचेही बोलणे सकारात्मक आहे असेही मंडिलक यांनी नमूद केले.

शाहू महाराज यांची उमेदवारी शरद पवारांचे षडयंत्र : संजय मंडलिक

शाहू महाराज यंदा निवडणुकीच्या रिंगणात असतील यावर मंडिलक म्हणाले कोण मोठा कोण छोटा म्हणून निवडणूक नसते. लोक मतदान करत असतात. आतापर्यंत केलेल्या कामांचा मला फायदा होईल. शरद पवार हे मोठे नाते आहेत. शाहू महाराजांना निवडणुकीत उभे करण्याचे त्यांचेच षडयंत्र आहे. शरद पवारांना जुना राग काढायचा असेल पण जनता सुद्धा आता याला तयार आहे असे खासदार मंडिलक यांनी स्पष्ट केले.

सन 2009 निवडणुकीत असं घडलं हाेते

सन 2009 मधील निवडणुकीत दिवगंत खासदार सदाशिव मंडलिक (sadashiv mandlik) हे अपक्ष म्हणून निवडणुक लढवत हाेते. त्यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांना ज्येष्ठ नेते शरद पवार उभे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची उमेदवारी दिली. त्यावेळी पवार यांनी मंडिलक यांचा वयाचा मुद्दा काढत बैल म्हातारा झालं की त्याला बाजार दाखवायचा असतो असा प्रचार केला हाेता. या निवडणुकीत दिवगंत खासदार सदाशिव मंडलिक यांचा विजय झाला. (Lok Sabha Election Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT