shiv sena and bjp karyakarta will work together in ratnagiri sindhudurg constituency assures ravindra chavan kiran samant  Saam Digital
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg Constituency: नारायण राणेंचा प्रचार करणार नाही? बैठकीत तक्रारींचा पाऊस; कुडाळात सेना-भाजपाची मनं जुळली

सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न होत असताना या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपस्थितामध्ये हा चर्चेचा विषय ठरला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :

महायुतीचे उमेदवार नारायण राणे (narayan rane) यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी शिवसेना आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते हे यापुढे एकत्रित येऊन काम करतील असा विश्वास आज (मंगळवार) पालकमंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) आणि सेना नेते किरण सामंत (kiran samant) यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना शिंदेगट आणि भाजप मधील अंतर्गत वादावर आज कुडाळ मध्ये बैठक झाली. त्यात नेत्यांनी तोडगा काढल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे विश्वासात घेत नाहीत असा आरोप करत आपण नारायण राणेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यानंतर आज दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कुडाळ येथे बैठक झाली.

या बैठकीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण, किरण सामंत, राजा गावकर आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर त्यांचे निरसन करण्यासाठी नेते मंडळींनी पुढाकार घेतला. या बैठकीत यापुढे एकत्रित येऊन काम करूया असा निर्णय झाला. शिवसेना आणि भाजप हे यापुढे एकत्रित येऊन काम करतील तसेच नारायण राणेंना मताधिक्यांनी निवडणून आणतील असे मंत्री चव्हाण यांनी नमूद केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न होत असताना या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपस्थितामध्ये हा चर्चेचा विषय ठरला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT