Shirur LokSabha Election Pawar vs Pawar 
लोकसभा २०२४

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Shirur LokSabha Election Pawar vs Pawar : बारामतीमध्ये रंगलेल्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवलाय. त्यामुळे बारामतीनंतर शिरूरची लढत दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेची बनवलीय. त्याचाच वेध घेणारा हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर

पुणे: राज्यातील सर्वाधिक हायप्रोफाईल लढत मानल्या जाणाऱ्या बारामतीनंतर आता दोन्ही पवारांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवलाय. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवार यांनी एका दिवसात थेट चार सभांचा धडाका लावला. तर अमोल कोल्हेंसाठी शरद पवारही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे चौथ्या टप्प्यातही पवारविरुद्ध पवार असाच संघर्ष पहायला मिळतोय. राजकीय सोयीसाठी शिवसेनेचे आढळराव घड्याळाच्या चिन्हावर लढत असले तरी अजित पवारांनी शिरूरची निवडणूक वैयक्तिकरित्या प्रतिष्ठेची केली आहे. मी जे बोलतो ते करतोच. अमोल कोल्हेंना पाडणारच असा पणच अजित पवारांनी केलाय.

अमोल कोल्हे शरद पवारांसोबत राहिल्याने अजित पवारांना शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छूक असलेल्या आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून हातात घड्याळ बांधलं. तर शरद पवारांनी अमोल कोल्हेंनाच पुन्हा संधी दिलीय. त्यामुऴे गेल्यावेळचेच प्रतिस्पर्धी मैदानात आहेत. आढळरावांसाठी अजित पवारांनी घोडेगाव, टाकळी हाजी, लोणी आणि ओतूर येथे दिवसभरात चार सभा घेतल्या. तर शरद पवारही कोल्हेंसाठी शिरूरच्या रणांगणात उतरले आहेत. पवारही कोल्हेंसाठी तीन सभा घेणार आहेत.

पवारांची 8 मे रोजी शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे तर 10 मेला चाकण बाजार समिती परिसरात सभा होणार आहे. 11 मेला जुन्नर तालुक्यातील राजूरी येथे सभा होणार आहे. शिरूरमध्ये खरी लढत ही कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी होत असली तरी कोल्हे अजितपवारांसोबत न गेल्यानं त्यांनी कोल्हेंच्या पराभवाचा चंग बांधलाय. तर कोल्हेंनी तुतारी हाती घेतल्यामुळे पवारांनीही पुणे जिल्ह्यावरच आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिरूरवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे इथेही कोणता पवार सरस ठरणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT