shekhar gore criticises jaykumar gore on water issue madha lok sabha constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Madha Constituency: पाण्याच्या मुद्यावर बोलताना बंधू जयकुमार यांच्यावर टीका करताना शेखर गोरेंचा जीभ घसरली

Madha Lok Sabha Election 2024 : माण खटाव मधील काही भागामध्ये निवडणुकीला मतदान कमी मिळाले म्हणून आमदार जयकुमार गाेरे यांनी पाणी दिलं नाही असा आराेप शेखर गाेरेंनी केला.

ओंकार कदम

Shekhar Gore :

सन 2024 च्या आमदारकीच्या अगोदर 179 गावांमध्ये पाणी आणून दाखवा शेखर गोरे माघार घ्यायला तयार आहे असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे (shekhar gore) यांनी आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांना दिले आहे. वडूज येथील मेळाव्यात शेखर गाेरे बाेलत हाेते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा मतदारसंघांत धैर्यशिल माेहिते पाटील आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत हाेत आहे. सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि माण खटाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी वडूज याचे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी काय कोणाच्या बापाचे आहे का ?

शेखर म्हणाले माण खटाव मधील काही भागामध्ये निवडणुकीला मतदान कमी मिळाले म्हणून या आमदारांनी पाणी दिलं नाही. पाणी काय कोणाच्या बापाचे आहे का ? लोकांना पाणी सोडतो म्हणून काही उपकार करतो का ? माण मध्ये 105 गावांपैकी 64 गावात आजही टँकर सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मग अशा माणसाला जलनायक कसं म्हणायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 2024 च्या आमदारकीच्या अगोदर 179 गावांमध्ये पाणी आणून दाखव शेखर गोरे माघार घ्यायला तयार आहे. जर पाणी आणलं तर मी स्वतः गावांमध्ये जयकुमार गोरे जल नायक आहेत असे बोर्ड लावीन असा टोला देखील शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT