sharad pawar uddhav thackeray to address rally in kolhapur tomorrow  Saam Digital
लोकसभा २०२४

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (मंगळवार) कोल्हापूर मध्ये येत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Lok Sabha Election :

भाजपला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स नाही म्हणून पाच टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्र मध्ये किमान दहा वेळा मोदी येतील तरी राज्यात काही फरक पडणार नाही असा दावा आज (साेमवार) महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील (satej patil) आणि मालोजीराजे छत्रपती (malojiraje chhatrapati) यांनी व्यक्त केला. महागाई, बेरोजगारी, घटना बदलण्यासंदर्भात त्यांच्या खासदारांची वक्तव्य असल्याने लोकांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात इंडियाचा आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (मंगळवार) कोल्हापूर मध्ये येत आहेत. गांधी मैदाना येथे हाेणारी सभा न भूतो न भविष्याती अशी असेल असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

मुख्यमंत्र्याचा काेल्हापूरातच तळ

सतेज पाटील म्हणाले शाहू महाराज निवडणुकीला उभारले त्यावेळी एवढं प्रेस्टीज भाजपकडून होणार नाही असं वाटलं होतं. राजर्षी शाहू महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेचा विचार आहे. मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसलेले आहेत याचं कारण कळत नाही असेही पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूरकरांचा निर्णय पक्का झालेला आहे. आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा, शाहूंचे विचार पुढे न्यायचे. त्यामुळे त्यांनी कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम कोल्हापूरकरांवर होणार नाही. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध का करत आहेत ? हे कळत नाही. आता जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपला महाराष्ट्रात आत्मविश्वास राहिला नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बाेलताना सतेज पाटील म्हणाले भाजपला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स नाही आहे म्हणूनच पाच टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्र मध्ये किमान दहा वेळा मोदी येतील खरे पण राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना कॉन्फिडन्स उरलेला नाही. मोदी आल्याने देखील राज्यात काही फरक पडणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.

ही निवडणूक जनतेच्या हाती : मालोजीराजे छत्रपती

शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे आणि शरद पवार उद्या कोल्हापूर मध्ये येत आहेत. गांधी मैदानात होणारी ही सभा न भूतो न भविष्याती अशी असेल असे मालोजीराजे छत्रपती यांंनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे जनतेच ठरल आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असली तरी त्याचा फरक इथे पडणार नाही असेही मालोजीराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT