shambhuraj desai criticizes sanjay raut on eknath shinde allegations  Saam Digital
लोकसभा २०२४

Shambhuraj Desai : संजय राऊतांना हवेत तीर मारण्याची सवय, महाराष्ट्रातील जनता त्यांना गांभीर्याने घेत नाही : शंभूराज देसाई

संजय राऊत यांना आता महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाही. रावतांना कोणत्या फाईल बद्दल माहिती आहे त्याबद्दल न्यायव्यवस्था आहे, यंत्रणा आहे त्यांना माहिती द्यावी असेही शंभूराज देसाईंनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

खासदार संजय राऊत (mp sanjay raut) हे रोज वेगळं बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या संदर्भातली माहिती जर तुमच्याकडे असेल तर त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावी अन्यथा न्यायालयात द्यावीत. हवेत तीर मारायचे आणि खोटे आरोप करायचे इतेकच काम राऊत यांना असल्याचे शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी राऊतांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आराेपावर नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

शंभूराज देसाई म्हणाले संजय राऊत यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीही नाही. संघटनात्मक बोलण्यासारखं काहीही नाही. ऊठसूठ मोठ्या लोकांवर आरोप करायचे आणि लोकांचं लक्ष या निवडणुकीपासून विचलित करायचं हा उद्योग राऊतांचा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राऊत यांना आता महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाही. राऊतांना कोणत्या फाईल बद्दल माहिती आहे त्याबद्दल न्याय व्यवस्था आहे, यंत्रणा आहे त्यांना माहिती द्यावी असेही देसाईंनी नमूद केले.

देसाई पुढे बाेलताना म्हणाले दररोज वेगळं काहीतरी सांगायचं. ही फाईल बंद केली, ती फाईल बंद केली. आमचं सरकार येणार आहे. फायली उघडणार आहे. सरकार येण्याचे दिवसा स्वप्न त्यांनी बघत बसावं. त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने याप्रमाणे दिवसा स्वप्न पडायला लागलेली आहेत. त्यांनी जरूर ही स्वप्न बघावीत पण केंद्र सरकार हे न्याय व्यवस्थेवरच चालणारं आहे ते कोणावरही अन्याय करत नाही असेही देसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

SCROLL FOR NEXT