Ratnagiri Sindhudurg Constituency : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीत जिल्ह्यात स्टॅम्पचा तुटवडा, जिल्हा मुद्रांक कार्यालय मार्ग काढणार?

Ratnagiri Latest Marathi News : स्टॅप आणि बाॅण्डचा तुटवडा निर्माण झाल्याने महसुल विभागातील अनेक कामांना ब्रेक लागला आहे. यामुळे नागरिकांचीही अडचण झाली आहे.
shortage of stamp paper in ratnagiri
shortage of stamp paper in ratnagiri saam tv
Published On

Ratnagiri :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीत जिल्ह्यात स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या स्टॅम्प व्हेंडरकडे स्टॅप आणि बाॅण्ड शिल्लक नाहीत. यामुळे अनेक सरकारी कामे खोळंबली आहेत. परिणामी नागरिकांचे मोठे हाल सुरु झालेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्टॅम्प व्हेंडर यांचे दर तीन वर्षांनी लायसन्सचे नुतनीकरण करण्यात येते. हे लायसन्स अद्याप नुतनीकरण झालेले नाही. त्यामुळे स्टॅम्प व्हेंडर अडचणी सापडलेत. प्राप्त माहितीनूसार जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडून मार्च महिन्याच्या शेवटी नुतनीकरणाचे लायन्सन देणे अपेक्षित हाेते परंतु तसे झाले नाही. (Maharashtra News)

shortage of stamp paper in ratnagiri
Buldhana Crime News : निवडणुकीच्या धामधूमीत तहसीलदाराने घेतली 35 हजार रुपयांची लाच, सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४० स्टॅम्प व्हेंडर आहेत. सध्या त्यांच्याकडे स्टॅप आणि बाॅण्ड नसल्याने प्रशासकीय कामाची माेठी अडचण झाली आहे. स्टॅप आणि बाॅण्डचा तुटवडा निर्माण झाल्याने महसुल विभागातील अनेक कामांना ब्रेक लागला आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा अडचणींना सामना करावा लागणार की काय असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shortage of stamp paper in ratnagiri
Kolhapur News : कोल्हापुरातील युवा पिढी गुन्हेगारीच्या वाटेवर, सत्यजित कदमांची गृहमंत्र्यांना लक्ष घालण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com