Sharad Pawar In Ahmednagar  google
लोकसभा २०२४

Sharad Pawar News: सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar Press Conference: २०२४ लोकसभेनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, या दाव्यावर पुन्हा एकदा त्यांनी मोठे विधान केले आहे.

Gangappa Pujari

सातारा, ता. ९ मे २०२४

भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते, भाजपसोबत ६ वेळा बैठकाही झाल्या होत्या, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच २०२४ लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

"काँग्रेस विचारधारेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक आहे. दोन्ही पक्ष स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत. एकत्र काम आणि एक विचारधारा यामुळे अधिक एकत्र काम करावं अशी माझी भावना आहे. मात्र सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत," असे शरद पवार म्हणालेत

तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांच्या दाव्यावरही शरद पवारांनी प्रत्यूत्तर दिले. काहीही झालं तरी "आम्ही गांधी नेहरुंचा विचार सोडणार नाही. आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या विचाराचे होते. मी सहकाऱ्यांना सांगितलेलं चर्चा करायची तर तुम्ही करा. मात्र सोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा नव्हता, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. त्यांचे अस्तित्व स्वतंत्र आहे," असेही महत्वाचे विधान त्यांनी केले.

अजित पवारांनी खदखद मांडली..

"परदेशी पक्ष म्हणून काँग्रेस सोडली अन नवीन पक्ष काढला. चार महिन्यात पुन्हा काँग्रेससोबत गेले. ही आपली स्टँटर्जी असल्याचे त्यांनी सांगितले आणि आम्हीही जी हुजुर केलं. मात्र आम्हीही ६० च्या पुढे गेलो आम्हाला कधीतरी संधी आहे का नाही? शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती ना हा कुठला न्याय?" अशा शब्दात अजित पवार यांनी खदखद व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT