Devendra Fadnavis: शरद पवार म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतात, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam tv

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या तयारीला वेग आला आहे. सर्वच पक्ष आपापल्या प्रचारात गुंतले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. तेथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतात, असा खोचक टोला फडणवीस (Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे.

अजित पवार यांनी उद्धव ठाकरे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात, हे मला माहीत नाही. मी उद्धवजी यांना चांगला ओळखलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांचा मार्गदर्शक शरद पवार आहेत. त्यामुळे पवार साहेब (Sharad Pawar) जे म्हणतील तेच उद्धवजी करतात, असा टोला त्यांनी ठाकरेंना यावेळी लगावला आहे.

तसंच देवेंद्र फडणवीस (Maharashtra Politics) म्हणाले की, पवार साहेबांसोबत पक्ष अजित पवार यांनी उभा केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. ते स्थान सुप्रिया सुळे यांनाच देतील म्हणून ते बाहेर पडले. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : काँग्रेस मजबूत, तर देश मजबूत होईल; शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis News) म्हणाले की, संजय राऊत यांचा मानसिक बॅलन्स गेलेला आहे. त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या मनोसपचार तज्ञाला दाखवावं. त्या ठिकाणी मदत घ्यावी. त्यांच्या लक्षात आलंय की, जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे. म्हणून ते आता शिवीगाळ करण्यावर उतरलेले आहेत. त्यांचं खरोखर मानसिक संतुलन बिघडलेलं असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis
Haryana Politics : हरियाणात राजकीय भूकंप; भाजप सरकार अल्पमतात असल्याचा काँग्रेसचा दावा, राष्ट्रपती राजवट लागणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com