Shashikant Shinde Criticized Mahesh Shinde:  Saam Tv
लोकसभा २०२४

Shashikant Shinde: 'मी घोटाळा केला असता तर भाजपमध्ये गेलो नसतो का?, शशिकांत शिंदे यांचे महेश शिंदे यांना प्रत्युत्तर

Priya More

ओंकार कदम, सातारा

महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadhi) साताऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर केला होता.

'कोर्टाने त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशा व्यक्तीला तुम्ही उमेदवार म्हणून उभे करता तर तुम्हाला यशवंत विचार सांगण्याचा अधिकार नाही.' अशी टीका महेश शिंदे यांनी शरद पवारांवर केली होती. आता त्यांच्या या टीकेलाच शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मी घोटाळा केला असता तर भाजपमध्ये गेलो नसतो का?', असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, 'आमदार महेश शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या चौकटीत बसतात का हा माझा पहिला प्रश्न आहे. हा यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा अशा लोकांच्या हातात जाऊ नये म्हणून मला उमेदवारी दिली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीच्या चौकटीत १०० टक्के आम्ही काम करतोय. कुणी कितीही प्रयत्न करू द्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची लढाई नक्की यशस्वी होईल. माझ्या उमेदवारीमुळे त्यांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. माझा जर चार हजार कोटीचा घोटाळा असता तर मी भाजपमध्ये गेलो नसतो का? मी त्यावेळीसही सांगितलं आहे. माझ्याकडून कोणताही घोटाळा झालेला नाही.' असे स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिले आहे.

शरद पवारांवर टीका केल्यावर काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितले की, 'बापाला विसरण्याची पद्धत काही लोकांच्याकडे असते. त्यामुळे मी जास्त अपेक्षा करणार नाही. मी सगळं सहन करीन परंतु शरद पवारांवर बोलल्यावर बाकी आम्ही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत. आपण आपल्या लायकीमध्ये राहावं. हा सातारा जिल्हा पवारसाहेबांवर कोण बोललं तर इतिहास घडवतो. पवारसाहेबांवर टीका केल्यावर काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. या निवडणुकीत अशाचप्रकारे पवारसाहेबांवर टीका केली तर सातारा जिल्ह्यातील जनता शरद पवारांचा आणि यशवंतराव चव्हाण यांचा कसा विचार घेतात हे दाखवून देतील आणि याचा फायदा आम्हालाच होईल.' असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवारांची लायकी नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने महेश शिंदे यांनी हे आरोप केले आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांनी भ्रष्टाचार केल्याचा महेश शिंदे यांचा आरोप आहे. याबाबत आज त्यांनी बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने खरेदी केलेल्या ३०० रुपये स्क्वेअर फुटाने गाळ्याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT