सोलापूर|ता. २० एप्रिल २०२४
राज्याच्या राजकारणात सध्या माढा लोकसभा मतदार संघ सर्वाधिक चर्चत आहे. माढ्यात दररोज नव्या राजकीय घडामोडी अन् कुरघोड्या पाहायला मिळत आहेत. अशातच माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे धैर्यशिल मोहिते पाटील यांना पाठिंबा वाढताना दिसत असतानाच रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याचे समोर आले आहे.
धैर्यशिल मोहिते पाटील यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील दिला नसल्याचा आक्षेप रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून मांडण्यात आला आहे. या हरकतीवर आज दुपारीच सुनावणी होणार असून काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माढ्यात महायुतीची वाट बिकट?
दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाणाक्ष खेळी करत उत्तम जानकर यांनाही आपल्या गोटात खेचले आहे. उत्तम जानकर यांच्यासह फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरही महायुतीच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे माढ्यातून महायुतीची वाट बिकट होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.