Sanjay raut, Eknath Shinde  Saam TV
लोकसभा २०२४

Sanjay Raut: 'मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड, शिंदे, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही', संजय राऊतांचा टोला

Maharashtra Loksabha Election 2024: महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजयी होईल, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी याबाबत महत्वाचे विधान केले.

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक, ता. १२ मे २०२४

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाहीत, तसेच महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजयी होईल, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी याबाबत महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले संजय राऊत?

"जी शिवसेना मोदी, शहांच्या मदतीने चोरली. त्याच्या मागे लोकांनी का उभे राहावे? एकनाथ शिंदेंकडे डॅमेज कंट्रोल करायला काहीच शिल्लक नाही. महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैश्यांच्या थैल्या वाटू द्या, खोटे गुन्हे टाकू द्या, मात्र लोक त्यांना मतदान देणार नाहीत." असा दावा संजय राऊत यांनी केला.

तसेच "नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात ठाण मांडले आहे. मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान ३५ जागा जिंकेल. तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते तन मन लावून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे, मात्र त्यांची अखेरची फडफड सुरू आहे," असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

'१५ तारखेला नाशिक महापालिकेच्या ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा खुलासा करणार आहे. यामध्ये कोण सहभागी आहे, लाभार्थी आहे, हे जनतेसमोर उघड करावे लागेल. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना हे पैसे मिळालेत. बिल्डर अचानक कसे शेतकरी झाले? त्यांना कसे पैसे मिळाले?' असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT