Sanjay Raut On CM Eknath Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Land Scam: नाशकात भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं? 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा थेट मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी एकीकडे भाजपसह महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच खासदार संजय राऊतांनी मोठ्ठा बॉम्ब फोडलाय.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut On CM Eknath Shinde:

>> तन्मय टिल्लू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी एकीकडे भाजपसह महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच खासदार संजय राऊतांनी मोठ्ठा बॉम्ब फोडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असताना नाशिक महापालिकेमध्ये 800 कोटींचा कथित जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा दावा राऊतांनी केलाय. याबबात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय.

बिल्डरांच्या घशात जमिनी घालून शिंदेंच्या काळात 800 कोटींचा घोटाळा, असा आरोप राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्राच्या प्रती सीबीआय, ईडी, आयकर विभाग, तसंच महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. राऊतांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊ.

राऊतांचा लेटरबॉम्ब

राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच 700 कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला. या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच एसआयटी, ईडी, सीबीआय, एसीबीमार्फतही चौकशी व्हावी, अशी मागणी राऊतांनी केलीय. मात्र हे सर्व आरोप शिंदे गटानं फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या नाशकातल्या सभेपूर्वीच राऊतांनी हा लेटरबॉम्ब फोडल्यामुळे निवडणुकीचं वारं फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महायुती कोणतं अस्त्र काढणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT