Vishwajeet Kadam Speech Sangli:
Vishwajeet Kadam Speech Sangli:  Saamtv
लोकसभा २०२४

Vishwajeet Kadam: सांगलीची जागा देणे चुकीचेच, कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही.. विश्वजित कदम कडाडले!

विजय पाटील

सांगली|ता. २५ एप्रिल २०२४

विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आज काँग्रेस पक्षाचा मेळावा सांगलीमध्ये पार पडत आहे. आजच्या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांंच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी नाकारण्यावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले विश्वजित कदम?

"सांगलीची जागा ही काँगेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट. मला ही सतत लोकसभा लढवण्यचे आवाहन करण्यात आले. मात्र मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो, असे विश्वजित कदम म्हणाले.

"सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले आणि आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसच खासदार असेल. पण जागा वाटप चर्चा सुरू झाल्यावर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला. शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढती असे ठरले होते. मगं ठाकरेंनी सांगलीवर कसा काय हक्क सांगितला?" असा सवाल विश्वजित कदम यांनी उपस्थित केला.

"उद्धव ठाकरे आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, हे असे चालते का? सांगलीची जागा देणे हे चुकीचेच होते. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते? सांगलीत आम्ही सर्व काँगेस नेते एकत्र आलो आणि त्याला दृष्ट लागली. पण ती दृष्ट काढता देखील येईल. पण शेवटी विजय हा आमचाच असेल, असे विश्वजित कदम म्हणाले.

याचा वचपा काढू..

"हे सगळे प्रयत्न करत असताना शेवटी काय झाले हे कार्यकर्ते विचारत होते. सापशिडीच्या खेळा प्रमाणे दुर्दैवाने आम्हाला साप चावला. ज्यांनी हे कटकारस्थान केले त्यांना सोडणार नाही. पतंगराव याचे गुण माझ्यात आहेत. विशाल यांना विनंती केली की भावा अपक्ष लढून नको, राज्यसभा भेटेल. पुढची लोकसभा लढवू, जिंकू, असेही सांगितले. आम्ही याचा वचपा काढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT