Mahabaleshwar Kates Point: केटस पॉईंटवरून १००० फूट खोल दरीत एकाची उडी, महाबळेश्वर ट्रेकर्सचे शाेधकार्य सुरू

Mahabaleshwar Latest Marathi News : उन्हाऴी सुटी सुरु झाल्याने महाबळेश्वर पर्यटकांनी बहरू लागले आहे. शनिवारपासून महाबळेश्वरात पर्यटकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
youth jumps from mahabaleshwar kates point
youth jumps from mahabaleshwar kates pointSaam Digital

Satara News :

महाबळेश्वर केटस पाँइंटवरून उडी मारून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या पाॅईंटवरुन दरीत उडी मारताना स्थानिक दुकानदारांनी पाहिल्यामुळे घटना समोर आली. सध्या महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक दरीत उतरले असून, शाेधकार्य सुरू असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरची आेळख आहे. उन्हाऴी सुटी सुरु झाल्याने महाबळेश्वर पर्यटकांनी बहरू लागले आहे. शनिवारपासून महाबळेश्वरात पर्यटकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

youth jumps from mahabaleshwar kates point
Sanjaykaka Patil : विशाल पाटलांच्या भानगडी पैलवान चंद्रहार जनतेला सांगतील : संजयकाका पाटील

पर्यटक महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय पॉईंट पाहणे, वेण्णा लेक तलाव येथील बोटिंगचा आनंद लुटताना दिसत आहेत. दरम्यान प्रसिद्ध असलेल्या केटस पॉईंट येथून एकाने खाेल दरीत उडी मारल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्थानिकांनी याची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सला दिली. त्यानंतर ट्रेकर्सच्या सहका-यांनी खाेल दरीत उतरुन संबंधितांपर्यंत पाेहचले. उडी मारणा-याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

youth jumps from mahabaleshwar kates point
Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; अमित शाह, राहूल गांधींच्या सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com