Maharashtra Loksabha Election 2024:  Saamtv
लोकसभा २०२४

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Loksabha Election 2024: उमेदवारीवरुन झालेल्या वादामुळे संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. सांगलीचा खासदार कोण होणार? याबाबत दावे प्रतिदावेही केले जात आहेत.

विजय पाटील

सांगली, ता. १९ मे २०२४

सांगली लोकसभेचा खासदार कोण होणार? याबाबत बुलेटची पैज लावणे सांगलीमधील दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

सांगली लोकसभेत महायुतीकडून संजय काका पाटील, महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. उमेदवारीवरुन झालेल्या वादामुळे संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. सांगलीचा खासदार कोण होणार? याबाबत दावे प्रतिदावेही केले जात आहेत. यावरुनच दोघा युवकांनी चक्क बुलेटची पैज लावली होती.

शिरढोण येथील रमेश जाधव यांनी संजय काका पाटील हे निवडून येतील असा दावा केला होता. आणि गौस मुबारक मुलाणी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील, असा दावा केला होता. यावरुनच दोघांनी आपापल्या बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली होती, या पैजेचा मजकुरही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मात्र आता ही पैज लावणे दोघांनीही चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जुगार अधिनियम कायद्याअंतर्गत पैज लावणाऱ्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने आंदोलकांनी बीड पाटोदा महामार्ग रोखला

Gauri Saree Draping: गौराईला साडी नेसवताना गोंधळ होतोय? 'या' ७ स्टेप्स फॉलो करून झटपट आणि सोप्या पद्धतीने नेसवा साडी

अभिजीत दिपकेंनी केली मोठी घोषणा; CJP हाती घेणार नवी मोहीम, महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून होणार सुरुवात

LPG eKYC Update : LPG बाबत महत्वाची अपडेट, eKYC संदर्भात संभ्रम, ReKYC करावी लागणार की नाही?

ST Bus: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, NCMC कार्डला अखेर मुदतवाढ; अखेरची तारीख काय?

SCROLL FOR NEXT