Gauri Saree Draping: गौराईला साडी नेसवताना गोंधळ होतोय? 'या' ७ स्टेप्स फॉलो करून झटपट आणि सोप्या पद्धतीने नेसवा साडी

Shruti Vilas Kadam

आधी साडीची लांबी व्यवस्थित ठरवा

गौराईच्या मूर्तीच्या आकारानुसार साडीची लांबी आणि रुंदी ठरवा. साडी जास्त लांब असल्यास ती आधी आवश्यकतेनुसार घडी करून ठेवा.

Gauri Ganapati | pinterest

कमरेभोवती साडी गुंडाळा

साडीचा एक टोक कमरेच्या मागील बाजूला ठेवून ती मूर्तीभोवती व्यवस्थित गुंडाळा. साडी सैल राहणार नाही याची काळजी घ्या.

Gauri Ganpati | yandex

पुढच्या बाजूला छोट्या घड्या करा

साडीचा उरलेला भाग समोर आणून छोट्या आणि समान घड्या तयार करा. या घड्या एकमेकांवर नीट बसवल्यास गौराईची साडी अधिक सुबक दिसते.

Gauri Alankar

घड्या व्यवस्थित बांधून घ्या किंवा खेचा

तयार केलेल्या घड्या कमरेच्या भागात व्यवस्थित खोचा. गरज असल्यास छोट्या सेफ्टी पिनचा वापर करा, जेणेकरून साडीची घडी हलणार नाही.

Gauri Ganpati | yandex

पदर खांद्यावर सेट करा

साडीचा पदर गौराईच्या एका खांद्यावरून पुढच्या बाजूला आणा. पदराची लांबी मूर्तीच्या आकारानुसार ठेवा आणि तो नीट पिनने सुरक्षित करा.

Gauri Ganpati | yandex

बॉर्डर समोरच्या बाजूला ठेवा

साडीला सुंदर बॉर्डर असल्यास ती समोरच्या बाजूला उठून दिसेल अशा पद्धतीने सेट करा. यामुळे गौराईची साडी अधिक आकर्षक आणि पारंपरिक दिसेल.

Gauri Ganpati | yandex

शेवटी साडी आणि दागिने सेट करा

साडी नेसवल्यानंतर कुठे घडी विस्कटली आहे का ते तपासा. त्यानंतर नथ, हार, गजरा किंवा इतर दागिने लावून गौराईचा सुंदर साज पूर्ण करा.

Gauri Pooja | pinterest

Irkal saree Design: सण आणि कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग, इरकल साडीचे 'हे' ७ सुंदर डिझाईन्स करा ट्राय

Irkal saree Design | Saam T
येथे क्लिक करा