Maratha kranti Morcha
Maratha kranti Morcha  Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election : सकल मराठा समाज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; मतदारसंघांची नावंही केली जाहीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत सोनावणे, नाशिक)

Loksabha Election Sakal Maratha Samaj Candidates :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो केलं होतं. आता मराठा समाजाचा आवाज लोकसभेच्या निवडणुकीत गुंजणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात सकल मराठा समाज उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिलीय.(Latest News)

उमेदवारीबाबत अंतिम धोरण ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाची २८ तारखेला नाशिकमध्ये बैठक होणार आहे. तर आदिवासी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचा उमेदवार देणार आहे. मराठा समाज आदिवासी समाजाच्या उमेदवाराच्या मागे सामजाची ताकद उभी करणार असल्याची माहितीही गायकर यांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची एकजूट आणि ताकद दाखवण्यासाठी निवडणूक लढवण्यात येणार आहे.

मराठा समाज योद्धा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २४ तारखेच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीविषयी काही सुचना केल्या आहेत. त्या सुचनांनुसार, एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा करायचा, असं सांगितलंय. त्यामळे नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा संघाच्या वतीने एकच उमेदवार दिला जाणार आहे.

या उमेदवारांच्या संदर्भात येत्या २८ तारखेला नाशिक येथे बैठक घेतली जाणार आहे. याच बैठकीत उमेदवारांवरील नावाचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच दिंडोरी हा मतदारसंघ अनुसूचित समाजासाठी राखीव ठेवण्यात आलाय. त्यामुळे तेथे त्याच समाजाचा उमेदवार द्यावा, आपल्याला जातीवाद करायचा नसल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितल्याचं गायकर म्हणालेत. त्यामुळे त्या समाजाच्या उमेदवारामागे मराठा समाज ताकदीने उभा राहील आणि त्याला जिंकून आणण्यास प्रयत्न करेल, असंही ते म्हणाले.

कोणत्याच राजकीय पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. जेपण ते आरक्षण त्यांनी दिलंय ते सर्व फसवे आहे. आरक्षणाची घोषणा करून ते निवडणूक जिंकून घेतात. त्यामुळे आता या घोषणांना बळी न पडता मराठा समाजाने एकजुटीने राजकीय पक्षांना योग्य जागा दाखवणं हाच सकल मराठा समाजाचा उद्देश असल्याचं गायकर म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Umbrella and Raincoat Shopping : पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट; छत्री आणि रेनकोट फक्त २५० रुपयांत!

Kolhapur: बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय, काेल्हापुरात डॉक्टर अटकेत; दाेघांकडून गर्भलिंग निदानाचे साहित्य जप्त

Solapur Crime: दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं

Nashik Lok Sabha: आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा, शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन

Today's Marathi News Live: महायुतीच्या सभेविषयी अफवा उडवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT