sadabhau khot says mahayuti will win major seats in maharashtra lok sabha election
sadabhau khot says mahayuti will win major seats in maharashtra lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Sadabhau Khot : राजू शेट्टी सगळ्यांच्या दारात जाऊन आरती करून आले, हातकणंगलेसह काेल्हापूरात महायुती जिंकेल : सदाभाऊ खाेत

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहील कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत. सगळे अली बाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीला या निवडणुकीत मूठ माती मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल असा विश्वास रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत (sadabhau khot) यांनी व्यक्त केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खाेत म्हणाले पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे असेही सदाभाऊ खाेत यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस शरद पवारांना तगडं आव्हान देताहेत

शरद पवार यांच्यावर टीका करताना खाेत म्हणाले भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही सर्व घटक पक्ष आहोत. या महाराष्ट्रात 70 वर्षाच्या राजकारणात मुठभर सरदारांचच राज्य होतं. या सरदारांना पायाखाली तुडवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस या माणसाने केलेला आहे.

त्यामुळेच पवारां सारख्या मुरब्बी नेत्याला जात काढावी लागली. देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना तगडं आव्हान देताहेत. आज त्यांना या वयात सुद्धा खोटं बोलत रेटून चालावं लागत आहे अशी टिप्पणी खाेत यांनी केली.

राजकारणातल्या शिवारात देखील ऋतु असतात

सदाभाऊ खोत सत्तेबाबत बाेलताना म्हणाले मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. चळवळीतले सर्व चढ उतार पाहिले. कधी मी आमदार, मंत्री होईन असं वाटलं नव्हतं. आमदारांमध्ये असणार वातावरण पाहता आलं. मंत्री काळातील शिवार पाहता आलं. शेती भातातलं शिवार बघितलं. आमदारकीचे शिवार बघितलं, मंत्रीपदाचा शिवार बघितलं, मग माझ्या लक्षात आलं शेताभातातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो.

राजकारणातल्या शिवारात देखील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतो. राजकारणात हिवाळा आला की गारव्याला लोक येतात. उन्हाळा आला की गडी पळून जातात आणि पाऊस लागला की नाचायला लागतात अशी टिप्पणी सदाभाऊ खोत यांनी केली.

बच्चू कडूंची नाराजी दूर हाेईल

बच्चू कडू हा चळवळीतला माणूस आहे तो महायुती सोबतच आहे. त्यांचा जो प्रश्न आहे तो जिल्हा अंतर्गत प्रश्न आहे. बच्चू कडू हे मित्र पक्ष शिवसेनेचे आहेत. भविष्यकाळात ही कटूता राहील असे मला वाटत नाही.

राजू शेट्टी सगळ्यांच्या दारात गेले

राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर बाेलताना खाेत म्हणाले महान शेतकरी नेत्यांचे एकला चलो रे असं काही नव्हतं. सगळ्यांच्या दाराला जाऊन आरत्या करून आले होते. बीजेपीलाही आतल्या अंगानं सांगितलं होतं मी निवडून आलो की तुमच्या बरोबरच राहणार. उद्धव ठाकरेंना सुद्धा सांगितलं होतं आदानींना आपल्याला काढायचं आहे आणि मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे ते खुशीत होते.

कळा काढणे एवढेच शेट्टींना काम

महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याबरोबर ते म्हणत आहेत अभिमन्यू सारखं चक्रव्यू केलेला आहे. अभिमन्यू लढत होता पांडवाच्या बाजूने तुम्ही लढत होता कौरवांच्या बाजूला आता कौरवामध्ये अभिमन्यू जन्माला आला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हातकणंगल्यामध्येच मी पाहत आहे.

हा कौरवांचा अभिमन्यू आहे म्हणून कळा काढण्या पलीकडे त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही. त्यांचा नंबर थ्री आहे. उपर आना नाही.. उदरही रहना... तूम्हारा काम खतम असं त्यांचे झालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT