ranjitsinh naik nimbalkar criticises dhairyasheel mohite patil on madha lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

Ranjitsinh Naik Nimbalkar : माढा लाेकसभा मतदारसंघाची माहिती नसणा-यांना दौरा करावा लागतो; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशील माेहिते पाटलांना चिमटा

dhairyasheel mohite patil : मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघात दौरा सुरू केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत नागणे

Madha Lok Sabha Constituency :

ज्यांना मतदारसंघाची माहिती नाही अशा लोकांना मतदारसंघाचा दौरा करावा लागतो असा टाेला अप्रत्यक्षरित्या माढ्याचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (bjp mp ranjitsinh naik nimbalkar) यांनी धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांना लगावला आहे. खासदार नाईक निंबाळकर हे पंढरपूर येथे आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. खासदार नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला माेहिते पाटील गटाकडून विराेध हाेत आहे. त्यातच आता खासदार नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर टिका केल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित माढा लोकसभा मतदारसंघातील गावा गावात जाऊन जनतेची गाठभेट घेत आहे. गाव भेट दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची माेहिते पाटील मतं जाणून घेत आहेत.

दरम्यान मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघात दौरा सुरू केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील शरद पवार गटाकडून (sharad pawar faction) निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच पंढरपूर येथे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरील टिकेस मोहिते पाटील काय उत्तर देतात हे आता पहावे लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT