Ramtek Loksabha Result Saam TV
लोकसभा २०२४

Ramtek Loksabha Result : तेलही गेलं आणि तूपही गेलं; खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या शिंदे गटातील उमेदवाराचा पराभव

Ramtek Loksabha Election Result 2024 : काँग्रेसमध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे गटात आलेल्या राजू पारवे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ruchika Jadhav

राज्यात काल लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. खासदकी मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने बाजी लावली. मात्र फोडाफोडी, पक्षबदलणे हे जनतेला पटलेलं नसल्याचं कालच्या निकालातून दिसलं. अशात काँग्रेसमधील आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे गटात आलेल्या राजू पारवे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रामटेक लोकसभा मदतारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रसच्या श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी मिळाली होती. या जागेसाठी राजू पारवे देखील इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटातून रामटेकसाठी पारवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अशात लोकसभेच्या या लढाईत मतदारराजाने काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंची निवड केली आहे. राजू पारवे यांना ५ लाख ३६ हजार २५७ मतं मिळालीत. तर श्यामकुमार बर्वे यांना ६ लाख १३ हजार २५ मतं मिळाली आहेत. ७६,७६८ मतांनी बर्वेंनी पारवेंचा पराभव केला आहे.

काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश करताना पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. महायुतीकडून राजू पारवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील प्रचारसभा घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी रामटेकमध्ये दाखल झाले होते. मात्र तरीही राजू पारवे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आमदारकी सोडली आणि खासदारकीही गेली अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Election Commission : नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार

Psychology of Couple fights : महिला की पुरुष, कोण जास्त भांडकुदळ? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

Lucky Zodiacs: धनत्रयोदशीच्या आधी 'या' राशींचे भाग्य उजळणार, आर्थिक लाभ होणार

SCROLL FOR NEXT