काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे रामटेकमधून कृपाल तुमने यांच्या जागी राजू पारवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
राजू पारवे आता शिंदे गटाकडून रामटेक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून रामटेकच्या या जागेवरून महायुतीचा पेच सुटत नव्हता. शिंदे गटानेदेखील रामटेकवर दावा केला होता. रामटेकमधील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याबद्दल अहवाल चांगला नाही. पर्यायी उमेदवार शोधा, असं भाजपने शिंदेंना कळवलं होतं. त्यानुसार आता शिंदेंचा उमेदवार शोध संपला आहे. पारवे हेच आता शिंदेंकडून रामटेकमधून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज वर्षा या शासकीय निवास्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जैस्वाल या सर्वांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश झाला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी जाहीरपणे आभार मानतो. या सर्वांच्या नेतृत्वात आता मी काम करणार असल्याचे राजू पारवे यांनी पक्षप्रनेशानंतर म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.