Election Campaign ANI
लोकसभा २०२४

Loksabha Election: तुमची दाढी करून देतो; पण मत द्या , प्रचारासाठी उमेदवारानं हाती घेतला वस्तारा Video Viral

Election Campaign: दाढी करून देतो पण मत द्या, असं म्हणत तमिळनाडूमधील एका अपक्ष उमेदवाराने आपला प्रचार सुरू केलाय. लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय, प्रत्येक उमेदवार आपला प्रचार करू लागलाय, त्यासाठी विविध आयडिया काढत मतदाराना आकर्षित करत आहेत.

Bharat Jadhav

Independent Lok Sabha Candidate Shaving Voters in Tamilnadu :

लोकसभा निवडणुकीत स्वत:चा प्रचार करणाऱ्या एका उमेदवाराने हाती वस्तारा घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केलं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवारानं आपला प्रचार करताना थेट मतदारांची दाढी करणं सुरू केलंय.(Latest News)

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालीय. लोकांना लोकशाहीचे महत्त्व सांगितले जात आहे. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग मोहीम राबवत आहे. तर उमेदवार आपल्या पक्षाचा प्रचारात व्यस्त झालेत. अशात एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराने एका सलूनला भेट दिली. सलूनमध्ये शिरताच या उमेदवारानं हातात थेट वस्ताराच घेतला.

हा व्हिडिओ तामिळनाडूमधील आहे. तेथील अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार परिराजन रामेश्वरम यांचा आहे. त्यांनी एका सलूनला भेट दिली, तेथे जाऊन त्यांनी न्हावीची भूमिका घेतली. तेथे आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.

माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यासंदर्भात विचारल्यानंतर ते म्हणाले की, लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. हे अपक्ष उमेदवार तामिळनाडूतील रामनाथपुरम येथील आहेत. ते निवडणूक प्रचारादरम्यान एक दिवसासाठी न्हावी बनले.

दोन दिवसापूर्वी गोरखपूरमधील उमेदवार रवी किशन यांना आपण चहा बनवताना पाहिलं होतं. रवी किशन गोरखपूरमध्ये जनसंपर्क मोहीम राबवत होते. प्रचारादरम्यान ते एका चहाच्या दुकानात थांबले आणि नंतर त्यांनी आले टाकलेला चहा बनवला. भारत ही अशी भूमी आहे जिथे गरीब असलेला व्यक्ती देश चालवू शकतो.

रॅली, रोड शो आणि सोशल मीडियाचा वापर

लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आता तीव्र झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष विविध रणनीती अवलंबत आहेत. निवडणूक प्रचारासाठी रॅली, रोड शो, सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. याशिवाय सर्व पात्र मतदारांना मतदानाची संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोग मतदार यादीत सुधारणा करत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये मतदानाच्या तारखा, नामांकन तारखा आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT