Raigad Lok Sabha Constituency  Saam TV
लोकसभा २०२४

Raigad Lok Sabha Constituency : राय'गड' कोण राखणार? पक्षफुटीचा फटका कुणाला आणि फायदा कुणाला?

Loksabha Election 2024 : 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968 एवढी मंत मिळाली. तर सेनेच्या अनंत गिते यांना 4 लाख 55 हजार 530 एवढी मतं मिळाली.

साम टिव्ही ब्युरो

तुषार ओव्हाळ

Raigad Lok Sabha Constituency :

रायगड लोकसभा मतदारसंघ, कोणे एके काळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला. आज इथे राष्ट्रवादीचा खासदार आहेत. इथूनच काँग्रेसचे सीडी देशमुख निवडून गेले होते आणि ते देशाचे अर्थमंत्री झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी त्यांनी राजीनामाही दिला होता. आज या मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. सुनील तटकरे इथून विद्यमान खासदार आहेत. पण २०१४ साली सुनील तटकरेंनीच तटकरेंचा पराभव केला होता. तो कसा? राष्ट्रवादीने इथे बस्तान कसं बसवलं? गेल्या दोन टर्म मधून इथलं राजकारण कसं बदललं? 2024 मध्ये काय आहे शक्यता आणि अंदाज आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

रायगड लोकसभेत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. त्यात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर या जागांचा समावेश आहे. रायगडमधून 2014 आणि 2019 मध्ये कोण किती मतांनी निवडून आलं हे जाणून घेऊयात.

2014 आणि 2019 चा निकाल

2014 साली शिवसेनेकडून अनंत गिते यांना उमेदवारी मिळाली. गिते यांना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68 मतं मिळाली. अवघ्या 2 हजार 110 मतांनी तटकरे यांचा पराभव झाला. तर शेकापच्या भाई कदम 1 लाख 29 हजार 730 मतं मिळाली. ही मतं जर तटकरे यांच्या पारड्यात पडली असती तर मोठ्या फरकाने तटकरे यांचा विजय झाला असता.

यात आणखी एक गंमत अशी की सुनील तटकरेंनीच सुनील तटकरेंचा पराभव केला. कारण 2014 साली सुनील तटकरे यांच्या विरोधात सुनील तटकरे नावाचा एक उमेदवार उभा होता. या डमी तटकरेंना 9 हजार 849 मंत पडली होती. 2 हजार 110 मतांनी राष्ट्रवादीच्या तटकरेंचा पराभव झाल होता. डमी तटकरेंना मिळालेली 9 हजार मतं जर राष्ट्रवादीच्या तटकरेंना मिळाली असती तर त्यांचा सहज विजय झाला असता.

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968 एवढी मंत मिळाली. तर सेनेच्या अनंत गिते यांना 4 लाख 55 हजार 530 एवढी मतं मिळाली. या निवडणुकीत गिते यांचा 31 हजार 438 मतांनी पराभव झाला.

दोन्ही निवडणुकीतील मतांचा टक्केवारी

2014 साली शिवसेनेच्या पारड्यात 40.11 टक्के मतं पडली होती. तर राष्ट्रवादीला 39.89 टक्के मतं पडली. 2019 ला शिवसेनेला 44.42 टक्के मतं मिळाली, तर राष्ट्रवादीला 47.49 टक्के मतं मिळाली. 2014 च्या तुलनेत 2019 ला शिवसेनेची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढली, पण पराभव झाला. राष्ट्रवादीची टक्केवारी 7.6 टक्क्यांनी वाढली आणि त्यांचा विजय झाला.

रायगडच्या सहा विधानसभेत कुणाचे किती आमदार?

2014 साली रायगडमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता. पण 2019 साली त्यांनी खातं उघडलं, त्यांचा एक आमदार निवडून आला. शिवसेनेचे 2014 साली दोन आमदार होते, त्यांची संख्या चारवर पोहोचली. राष्ट्रवादीचा एक आमदार कमी झाला. तर शेतकरी कामगार पक्षाचे दोन आमदार होते, 2019 ला त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही.

2014 साली राष्ट्रवादीसोबत असलेले भास्कर जाधव शिवसेनेत आले आणि 2019 साली धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. त्यामुळे इथे शिवेसेनेची ताकद आणखी वाढली. 2019 साली जिथून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला तिथे सहापैकी शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते.

राजकीय बदलांनंतर समीकरणे बदलली

2019, 2022 आणि 2023 ला राज्यात राजकीय भूकंप झाले. त्यानंतर राज्याचं राजकीय समीकरण बदलंल. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा इथल्या शिवसेनेच्या चार पैकी तीन आमदारांनी शिंदेंना साथ दिली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा सुनील तटकरेंनी त्यांना साथ दिली. तेव्हा राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार अदिती तटकरेही अजित पवार गटात गेल्या आणि त्यांना मंत्रिपदही मिळालं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर इथे भाजपची फारशी ताकद नव्हती. पण आता इथलं राजकारण 180 अंशाने बदललं. पाच आमदार आणि विद्यमान खासदार हे भाजपसोबत गेले. त्यामुळे भाजपची ताकद चांगलीच वाढली.

2022 ला एकनाथ शिंदे आणि 2023 ला अजित पवारांनी बंड केलं. त्यामुळे रायगडमध्येही याचे पडसाद पडले. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे इथे सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंना बसला. कारण चारपैकी तीन आमदार हे शिंदेंसोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंची इथली ताकद कमी झाली. राष्ट्रवादीचा खासदार आणि एक आमदार होता, त्यांनी अजित पवारांना साथ दिली त्यामुळे शरद पवारांना फटका बसला. शिंदे आणि अजित पवारांच्या बंडामुळे भाजपची ताकद वाढली.

यंदाच्या निवडणुकीत कसा होईल परिणाम?

सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांनी जरी भाजपला साथ देण्याचे ठरवले तरी भाजपच्या इथल्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरेंच्या उमेदवारीला विरोध केलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेकापचे धैर्यशील पाटील भाजपमध्ये आले. पाटीलच भाजपकडून रायगड लोकसभा लढवतील असं सांगितलं जात होतं. पण अजित पवार गट भाजप सोबत आल्याने भाजपचं हे गणित बिघडल्याचं चित्र आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून अनंत गिते यांना उमेदवारी जाहीर झालीये. या सगळ्यात अजूनही शेकापने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आह. शेकापची साथ मिळाल्याने ठाकरे गटाच्या अंगावर मुठभर मांस चढलंय.

भरत गोगावले हे शिंदे गटात सामील झाले, पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. पण त्यांचे पूर्वीचे राजकीय शत्रू समजले जाणारे तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या भाजपसोबत आल्या आणि त्यांन मंत्रिपदही मिळालं. त्यामुळे भरतशेठ गोगावले काही काळ नाराज होते अशीही चर्चा होती. त्यात भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 2014 ला सुनील तटकरेंनीच सुनील तटकरेंचा पराभव केला, पण 2019 साली तटकरेंचा विजय झाला. आता 2024 ला पुन्हा तटकरे विरुद्ध तटकरे असा सामना पहायला मिळणार का? आता रायगडमध्ये ठाकरे गटाची जादू चालणार की तटकरेंना मतदार पुन्हा साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT