Rahul Gandhi  Saam Digital
लोकसभा २०२४

Rahul Gandhi : PM नरेंद्र मोदी मौनव्रतात, आता चर्चा अशक्य; ४५ तासांच्या ध्यानधारणेवरून राहुल गांधींनी काढला चिमटा

Lok Sabha Election 20234/Indian Politics 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ४५ दिवसांच्या ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला गेले आहेत, त्यावर राहुल गांधी टीका केली आहे.

Sandeep Gawade

जवळपास अडीच महिन्यांनंतर प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. उद्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. प्रचार संपतानाही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या ४५ तासांच्या ध्यानधारणेवरून टीका केली आहे. नरेंद्र मोदींनी आपण एकत्र चर्चेसाठी आवाहन केलं होतं मात्र ते आले नाहीत. आता चर्चा शक्य नाही कारण ते मौनव्रतात गेल्याचं म्हणत, चिमटा काढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील त्यांचा दोन महिन्यांचा निवडणूक प्रचार संपल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे 45 तासांची ध्यानधारणा सुरू केली. तिरुअनंतपुरमहून हेलिकॉप्टरने आल्यानंतर पीएम मोदींनी भगवती अम्मान मंदिरात पूजा केली आणि ध्यानधारणेला सुरुवात केली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवसावरून राहुल गांधींनी काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांनी सूचना केल्या. आज लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता, प्रचार संपला देशात INDIA आघाडीचं सरकार बनणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की शेवटच्या मिनिटापर्यंत पोलिंग बूथ, EVM मशिन्सवर लक्ष द्या. मी पंतप्रधान यांना आवाहन केलं होत की मी डिबेट साठी तयार आहे तुम्हीही या, पण ते आले नाहीत. आता डिबेट शक्य नाही कारण पंतप्रधान मौनव्रतासाठी गेलेत, अस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

स्वामी विवेकानंदांचं नाव असलेल्या स्मारकात मोदींच्या ४५ तासांच्या मुक्कामासाठी कडक सुरक्षेसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये मुक्काम करणार आहेत. 1892 च्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदांनी येथे ध्यान केलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ गुहेत ध्यान केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

Soldier Death : गुढे येथील जवानाला पश्‍चिम बंगालमध्ये वीरमरण; कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT