Rahul Gandhi News : तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. राहुल गांधी हेलिकॉप्टरमधून केरळच्या वायनाडमध्ये चालले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, 'तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर लँडिग झाल्यानंतर निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. तामिळनाडूत ते रोडशोमध्येही सहभागी झाले होते. मागच्या ५ वर्षात राहुल गांधी यांनी संसदेत वायनाड लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय.
राहुल गांधी यंदा देखील केरळ वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकभेच्या रिंगणात उतरले आहेत. या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा सामना हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एनी राजा यांच्याशी होणार आहे. सीपीआय हा पक्ष इंडिया आघाडीतील घटक पक्ष देखील आहे. केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे.
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाची स्थापना २००८ साली झाली. तेव्हापासून या मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे. या लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. या लोकसभा मतदारसंघात मनंथावाडी, सुल्तानबथेरी, कल्पेट्टा आणि कोझीकोड या जिल्ह्यांचा समावेश आहे. २००९ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे एमआय शानवास जिंकले होते.
वायनाड लोकसभा मतदारसंघात ८.१८ लाख इतकी लोकसंख्या आहे. यात ४.०१ लाख पुरुष आहेत. तर ४.१५ लाख महिला आहेत. या जिल्ह्याची साक्षरता ८९.०३ टक्के आहे. वायनाडमध्ये ४९.४८ टक्के हिंदू आहेत. २८.६५ टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. तर ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या ही २१. ३४ टक्के इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.