Rahul Gandhi On PM Modi
Rahul Gandhi On PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: 'सूरत'वरून धुरळा! राहुल गांधी संतापले; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!

Satish Kengar

Rahul Gandhi On PM Modi:

हुकूमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावरूनच राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.

'ही देश वाचवण्याची निवडणूक'

X वर पोस्ट करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ही फक्त सरकार स्थापनेची निवडणूक नाही, ती देश वाचवण्याची निवडणूक आहे. संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे.''

दरम्यान, येथून काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर इतर सर्व 8 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. सर्व उमेदवारांनी नावे मागे घेतल्यानंतर सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुकेश दलाल यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले.

गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी सोमवारी सोशल मीडियावर मुकेश दलाल यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाटील यांनी मुकेश दलाल यांच्या फोटोसह X वर लिहिले की, 'सुरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिले कमळ अर्पण केले. सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

रिटर्निंग ऑफिसर सौरभ पारधी यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, यशस्वी नामांकन असलेल्या आठ उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत आणि त्यामुळे दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.' बसपचे प्यारेलाल भारती हे सोमवारी अर्ज मागे घेणारे शेवटचे उमेदवार होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी नाव मागे घेताच दलाल जिंकले. सुरतमध्ये 15 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 22 एप्रिलपर्यंत नावे मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सुरतमध्ये तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT