quarrels of babajani durani and saeed khan faction may effect mahadev jankar in parbhani lok sabha election 2024 Saamtv
लोकसभा २०२४

Parbhani Constituency: इफ्तार पार्टीला महादेव जानकर गेले नाहीत, महायुतीमधील एक गटाची ओढवली नाराजी

parbhani lok sabha election 2024: महादेव जानकर यांनी दूराणी गटाला पसंती दर्शविल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महादेव जानकर यांच्या विरोशात गुप्त बैठक झाली.

राजेश काटकर

Mahadev Jankar :

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार बाबाजानी दूराणी आणि शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी आयाेजिलेल्या कार्यक्रमांपैकी महादेव जानकर यांनी दूराणींना पसंती दिल्याने खान यांचा गट नाराज झाला आहे. दरम्यान दूराणी आणि खान यांच्यातील राजकीय वैमनस्याचा फटका परभणी लाेकसभा मतदारसंघात महयुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी डाेकेदुखी ठरणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना (ramadan month) सुरू आहे. रमजान निमित्त शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरी (pathri) येथे नुकतीच इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या इफ्तार पार्टीत शिंदे गटाचे जिल्हाभरातील आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी आणि हजारो मुस्लिम बांधवांना निमंत्रित करण्यात आले होते.

विशेष बाब म्हणजे याच इफ्तार पार्टीला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले होते. दरम्यान महादेव जानकर हे सईद खान यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले नाहीत. ते का आले नाहीत याची माहिती समजू शकली नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाथरी येथेच अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दूराणी यांच्या इफ्तार पार्टीला जानकर उपस्थित असताना ते खान यांच्याकडे न गेल्याने शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पाथरी येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि बाबजानी दूराणी यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. महादेव जानकर यांनी दूराणी गटाला पसंती दर्शविल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महादेव जानकर यांच्या विरोशात गुप्त बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली. या बैठकीचा तपशील समजू शकला नसला तरी महादेव जानकर यांना निवडणुकीच्या काळात शिंदे गटाची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार हे निश्चित.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT