Pune Loksabha Election 2024: Saam Tv
लोकसभा २०२४

Pune Loksabha: मतदानाआधी पुण्यात मोठी घडामोड! रवींद्र धंगेकरांचे निवडणूक आयोगाला पत्र; भाजपवर गंभीर आरोप

Pune Loksabha Election 2024: भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत चार मतदार संघ संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. १२ मे २०२४

शिरुर, मावळ, पुण्यासह लोकसभेच्या ११ मतदार संघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत चार मतदार संघ संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांविरोधात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचे आव्हान आहे. उद्या पुणे लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे, त्याआधीच रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे.

या पत्रामध्ये त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चारही मतदारसंघात भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार नागरिकांना धमकावत असून मतदान करण्यास प्रतिबंध करत असल्याचा सुद्धा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे बेकायदेशीर मतदारांची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून गाडी मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या मतदानादिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT