Devendra Fandanvis: 'बारामतीत अजित दादा एकटे अभिमन्यूसारखे लढले; भाजपला त्याचं अप्रुप', देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमनं

Devendra Fandanvis Interview: सकाळ' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण, लोकसभा निवडणूक आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी यावर प्रखडपणे भाष्य केले.
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam TV

नागपूर, ता. १२ मे २०२४

"बारामतीच्या लढाईत अजित दादांना कुटुंबाने एकटे पाडले, ते अभिमन्यूसारखे लढले असे म्हणत भाजपला त्यांच्या लढाईचे अप्रुप आहे," असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'सकाळ' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण, लोकसभा निवडणूक आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी यावर प्रखडपणे भाष्य केले. यामध्ये अजित पवार यांना भाजपला पाठिंबा देण्यासोबतच बारामती लोकसभा निवडणुकीवरुन त्यांनी दादांचे कौतुक केले.

बारामतीत दादा एकटे पडले..

"अजितदादा मोदीजींच्या विकासकामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन आले. त्यांच्यावरच्या आरोपांमुळे ते आले नाहीत. त्यांचे दोष सिध्दही झालेले नाहीत. २०१३ साली मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आरोप केले होते. भाजपप्रदेशाध्यक्ष म्हणून तशी मागणी मी केली होती. बाकी भाजपने त्यांना स्वीकारले का? असे विचाराल तर बारामतीच्या लढाईत दादांना त्यांच्या कुटुंबाने एकटे पाडले. ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. आमच्या लोकांना भाजपला त्या लढ्याचे अप्रूप वाटतेय," असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Maval News : पवना नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू; मित्रांसोबत पोहायला गेला असतानाची घटना

राज ठाकरेंचेही कौतुक..

"राज ठाकरे हे राजकारण्यांच्या वर्तमानपिढीत प्रभावी नरेटिव्ह देवू शकणाऱ्या प्रमुख नेत्यातले एक आहेत. हिंदुत्व या मुद्द्यावर ते परत स्थिरावले आहेत. अशा ठाकरेंचे स्वागत आहे. या वेळी लोकसभेत त्यांना जागा देवू शकलो नाही. कारण आम्ही तिघे पक्ष एकत्र होतो. जागा केवळ ४८.आता विधानसभेत बघू," असे म्हणत राज ठाकरेंचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष अन् चिन्ह पुन्हा मिळणार? 'रोखठोक' मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com