Suyash Tilak Saam Tv
लोकसभा २०२४

Suyash Tilak: मला तो हक्क बजावता आला नाही, मतदान करता न आल्यामुळे सुयश टिळकने व्यक्त केली खंत

Loksabha Election Voting In Pune: मतदान बूथवर दुसरेच नाव आल्यामुळे सुयश टिळकला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. सुयश टिळकने वेगवेगळ्या बूथवर जाऊन आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्याचे नाव सापडले नाही.

Priya More

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पुण्यामध्ये अनेक सेलिब्रिटी मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशामध्ये मराठमोळा अभिनेता सुयश टिळकला (Suyash Tilak) मतदान करता आले नाही. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने याबाबत खंत व्यक्त केली.

मतदान बूथवर दुसरेच नाव आल्यामुळे सुयश टिळकला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. सुयश टिळकने वेगवेगळ्या बूथवर जाऊन आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्याचे नाव सापडले नाही. अशामध्ये यावेळी मला तो हक्क बजावता आला नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

सुयश टिळकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मतदान करता न आल्याबद्दल खंत व्यक्त करत पोस्ट केली आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने असे लिहिले की, 'गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारण्यासाठी अर्ज दिला होता. ह्यावेळी सुदैवाने ऑनलाइन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले असता त्यात तीच चूक होती.

सुयश टिळकने पुढे लिहिले की, 'वोटिंग बूथला सकाळी ७ वाजता पोहचलो. माझ्या ऑनलाइन पोर्टलवरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागीच बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले. म्हणून मी ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक ह्यावेळी काही जणांचा मतदारसंघच बदलला आहे ते कळले. म्हणून वेगळ्या मतदारसंघात पण चौकशी केली शोधाशोध केली.'

तसंच, 'गेली अनेक वर्षे मी मतदान न चुकता करत आलो आहे. ह्यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही याची खंत वाटत राहिल.' यावेळी मतदान करता न आल्यामुळे सुयश टिळक नाराज झाला असून त्याने सोशल मीडियावर आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI Video Creation: व्हिडिओ मेकिंग सोपं झालं! स्क्रिप्ट अपलोड करा आणि बघा कमाल, कोणतं आहे नवीन फिचर? वाचा सविस्तर

Mithila Palkar: साउथ इंडियन लूकमध्ये मिथिलाचं सौंदर्य खुललं| PHOTO

Black Box For Tractors: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्सची सक्ती; नव्या नियमांवर संतापाची लाट

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT