Prakash Ambedkar on Uddhav Thackeray and Eknath Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

साम टिव्ही ब्युरो

Prakash Ambedkar On Shiv Sena:

>> तन्मय टिल्लू

राज्यात लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोट आणि दावे-प्रतिदाव्यांना चांगलीच धार आलीय. यात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीही मागे नाही. लोकसभेपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केलेल्या आणि जागावाटपावरून मविआशी फारकत घेतलेल्या आंबेडकरांनी अखेरच्या टप्प्यात ठाकरेंच्या शिवसेनेलाच टार्गेट केलंय.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार असल्याचा मोठा दावा करत आंबेडकरांनी खळबळ उडवून दिलीय. मात्र ही शक्यता ठाकरे गटानं फेटाळून लावलीय.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंचा समझोता झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र आले, तर आश्चर्य वाटायला नको. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना हे मत खाण्यासाठी अशा प्रकारे सेटिंग करतात. आमच्यातून जे निघून गेले आहेत, त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही.

उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा आंबेडकरांनी केल्यामुळे प्रचारात वेगळीच राळ उठलीय. आंबेडकर जाहीरसभेत बोलताना एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्यानंतर भाजपसोबत जाणार असल्याचंही भाकीत त्यांनी वर्तवलंय.

दोन्ही राष्ट्रवादी विधानसभेच्यापूर्वी एकत्र येणार अशा चर्चा नेहमीच रंगत असतात. मात्र आता आंबेडकरांनी शिवसेनेबाबत जाहीररित्या एकत्र येणार असल्याचा दावा केल्यामुळे मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातल्या प्रचाराला आता आणखी वेगळा रंग चढलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT