Pakistan Privatisation News:
>> मयुरेश कडव
दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्ताननं सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही, तर व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार करणं हे सरकारचं काम आहे, असं म्हणत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी कंपन्यांनं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.
सीमेपलिकडून भारताविरोधात कुचाळक्या करणाऱ्या पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय झालीय. कर्जबाजारीपणा आणि महागाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं पुरतं मोडलंय. हे कमी होतं म्हणून की काय आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय इस्लामाबादमध्ये झालेल्या प्रायव्हेटायजेशन कमिशनच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केलीय. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही असं सांगत पंतप्रधान शरीफ यांनी हा मोठा निर्णय घेतलाय.
पहिल्या टप्प्यात 24 कंपन्यांची विक्री होणार आहे. सर्वात आधी पाक एअरलाईन्सची विक्री करण्यात येईल. त्यानंतर इतर कंपन्यांची विक्री केली जाईल. खासगीकरणासाठी सरकारकडून एक पॅनल नियुक्त केलं जाणार आहे. शिवया या कंपन्यांच्या बोलीचं थेट प्रक्षेपण केलं जाईल.
फायनल व्हीओ - कंगाल झालेल्या पाकिस्तानला गेल्या वर्षी IMFनं 10 हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. मात्र IMFनं काही जाचक अटीही लादल्या होत्या. सर्व अनुदान रद्द करण्यात यावं. पेट्रोल-डिझेल, वीजेचे दर वाढवण्यासोबत कर संकलन वाढवण्याची अट घालण्यात आली होती.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानं याआधीच काही बंदरं आणि विमानतळांची विक्री केलीय. आता खासगीकरणाचा घाट पाकिस्तानला तारणार की जनतेचं कंबरडं मोडणार हेच पाहावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.