Prajwal Revanna Saam Digital
लोकसभा २०२४

Prajwal Revanna News : सर्वात मोठी बातमी! कर्नाटकातून प्रज्ज्वल रेवन्ना यांचा दारुण पराभव

karnataka Lok Sabha Election Results Live Update: प्रज्वल रेवन्ना कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसांघातून पराभूत

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे. हसन मतदार संघातून पराभव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल विजय झाले आहेत. प्रज्ज्वल रेवन्ना यांना 502297 मेते मिळाली आहेत. तर 529857 मेते मिळून श्रेयस पटेल विजय झाले आहेत.

याच लोकसभा मतदारसांघातून 2019 मधून प्रज्ज्वल रेवन्ना विजय झाले होते. ही सीट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची आहे. 2019 मध्ये त्यांनी आपले नातू प्रज्ज्वल यांच्यासाठी ही सीट सोडली होती. जिथून आता प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान, प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप केले होते. 26 एप्रिल रोजी दक्षिण कर्नाटकातील मतदारसंघात मतदान संपल्यानंतर काही तासांनंतर त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याआधीच ते भारत सोडत जर्मनीला निघून गेले होते. त्यानंतर देशभरात यावरून मोठं राजकरण तापलं होतं. यानंतर याप्रकरणी चौकशीसाठी कर्नाटक सरकारने एसआयटी तयार केली होती. भारताबाहेर असलेल्या प्रज्ज्वल रेवन्ना यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलं होतं.

पुढे प्रज्ज्वल रेवन्ना यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत आपण भारतात येणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी एसआयटी चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर भारतात आपल्यावर त्यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi: दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार बंपर गिफ्ट; कराबाबत पीएम मोदींची मोठी घोषणा

Independence Day 2025 Live Update: मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला- पीएम मोदी

Lenovo Tab: नवीन लेनोवो टॅब भारतात लाँच! दमदार फीचर्ससह १०,९९९ रुपयांपासून उपलब्ध

PM Narendra Modi : यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, सिंधू पाणी करारावरून पीएम मोदींनी पाकिस्तानला खडसावले

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

SCROLL FOR NEXT